महालक्ष्मी स्टेशनचे रुपडे पालटणार; मुंबई पालिकेचे ९० लाखांचे टेंडर

Mahalaxmi Railway station
Mahalaxmi Railway stationTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी स्थानक व परिसरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून यासाठी मुंबई महापालिकेने टेंडर मागवली आहेत. सुमारे ९० लाखांची ही टेंडर आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मार्च 2023 अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत 'माझी महालक्ष्मी'चे आकर्षक शिल्प, सायकल ट्रॅक, दिशादर्शक फलक, जंक्शनचे सौंदर्यीकरण अशी कामे महालक्ष्मी स्टेशन आणि परिसरात होणार आहेत. त्यामुळे महालक्ष्मी स्टेशन आणि परिसराचे रुपडे पालटणार आहे.

Mahalaxmi Railway station
EXCLUSIVE:नगरविकासच्या तब्बल अडीच हजार फाईल्स ३ महिने होत्या कुठे?

मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत रस्ते, पदपथ, वाहतूक बेटांच्या सौंदर्यीकरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संपूर्ण मुंबईसाठी 1700 कोटींच्या खर्चाचे नियोजनही करण्यात येणार आहे. यात या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत 50 टक्के तर मार्च 2023पर्यंत उर्वरीत 50 टक्के सौंदर्यीकरणाची कामे केली जाणार आहेत. यात पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी स्थानक आणि परिसराचा कायापालट केला जाणार आहे. महालक्ष्मी हे महत्त्वाचे स्थानक असून महालक्ष्मी मंदिर, वरळी नेहरू तारांगण, हाजी अली दर्गा या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. तसेच महालक्ष्मी परिसरात कॉर्पेरेट कार्यालये असून रोज शेकडो प्रवासी महालक्ष्मी स्थानकातून ये-जा करतात.

Mahalaxmi Railway station
धारावी पुर्नविकासात 'डीएलएफ' दावेदार? 'अदानी', 'नमन'चेही टेंडर

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी स्थानक व परिसरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून यासाठी मुंबई महापालिकेने टेंडर मागवली आहेत. या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मार्च 2023 अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे.

कोणती कामे होणार?
महालक्ष्मी स्थानक परिसरात सायकल ट्रॅक
प्रवाशांसह ये-जा करणार्यांना बसण्यासाठी बेंच
कुठला रस्ता कुठे जातो दिशादर्शक फलक
स्थानक परिसरातील जंक्शनचे सौंदर्यीकरण
'माझी महालक्ष्मी' शिल्प तयार करणार 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com