Mumbai : अबब! बड्या धेंडांकडे 550 कोटींची थकबाकी; बीएमसीचा अल्टिमेटम

Mumbai
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : काही मोठ्या थकबाकीधारकांकडून अद्याप कर भरणा करण्यात येत नसल्याने आाणि त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने कर निर्धारण व संकलन खात्याच्यावतीने जप्तीची नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दंड रकमेसह थकबाकीचा यात समावेश आहे. महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार लिलावाची कार्यवाही करण्यात येईल. यामुळे नोटीसप्राप्त मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Mumbai
Mumbai-Pune Expressway : मिसिंग लिंकअंतर्गत दोन्ही बोगद्यांचे 98 टक्के काम पूर्णत्वास; येत्या 4 महिन्यात...

मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ताकर देयके मिळाल्यापासून 90 दिवसांच्या आत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास 'डिमांड लेटर' पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ता धारकास 21 दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाते.

Mumbai
Mumbai : मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळल्याने बीएमसी 'अ‍ॅक्शन मोड'वर; 'त्या' कामांना देणार दणका

निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना महानगरपालिकेकडून कलम 203 अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्तेवर कलम 204,205,206 अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करुन लिलाव केला जाईल. जप्त चीज वस्तुतूनही कर वसूल झाला नाही तर, कलम 206 अन्वये मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. कर निर्धारण व संकलन खात्याच्या वतीने मुंबई शहर व उपनगरांमधील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती तसेच आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांची कर भरणा करण्याकरीता होणारी गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईल सुविधा उपलब्ध आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कर भरणा ऑनलाईन करण्याकरीता करदात्यांनी महानगरपालिका संकेतस्थळावरील माहितीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Mumbai
Mumbai : दक्षिण मुंबईतील रखडलेल्या 'त्या' 7 प्रकल्पांसाठी लवकरच टेंडर

बडे मालमत्ता कर थकबाकीदार -
दि रघुवंशी मिल्स् लिमिटेड (जी दक्षिण विभाग) - 119 कोटी 58 लाख 98 हजार 600 रुपये
मेसर्स ओंकार डेव्हलपर्स प्रा. लि. (जी दक्षिण विभाग) - 104 कोटी 78 लाख 25 हजार 713 रुपये
जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एच पूर्व विभाग) - 71 कोटी 98 लाख 03 हजार 445 रूपये
जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एच पूर्व विभाग) - 67 कोटी 52 लाख 10 हजार 502 रूपये
मेसर्स स्टर्लिंग इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लि.(जी दक्षिण विभाग) - 55 कोटी 10 लाख 56 हजार 956 रुपये
मेसर्स विमल असोसिएट्स (के पूर्व विभाग) - 41 कोटी 74 लाख 11 हजार 215 रुपये
दि रघुवंशी मिल्स् लि. (जी दक्षिण विभाग) - 38 कोटी 48 लाख 67 हजार 795 रुपये
प्रोव्हिनंस लॅण्ड प्रा. लि. (जी दक्षिण विभाग) - 33 कोटी 69 लाख 07 हजार 79 रुपये
समीर एन. भोजवानी (के पश्चिम विभाग) - 33 कोटी 39 लाख 45 हजार 40 रूपये
मेसर्स श्रीराम मिल्स् लि. (जी दक्षिण विभाग) - 33 कोटी 23 लाख 54 हजार 965 रूपये

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com