परळमध्ये भूमिगत टाक्यांसाठी दोन स्वतंत्र टेंडर का?

पावसाचे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये अडविण्यात येणार
Hindmata Parel
Hindmata ParelTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : हिंदमाता (Hindmata) परळ (Parel) परिसरातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भूमिगत टाक्या बनविण्यात येत आहेत. या प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरु करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने (Mumbai Municipal Corporation) टेंडर (Tender) मागविले आहेत. परळ येथील संत झेव्हीअर्स मैदान (Zaviers Ground) आणि दादर (Dadar) येथील स्वर्गीय प्रमोद महाजन (Pramod Mahajan) मैदानात टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी महानगर पालिका 67 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. मात्र, याच प्रकल्पासाठी दोन स्वतंत्र टेंडर (Tender) का मागविण्यात येत आहेत, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Hindmata Parel
मुंबई महापालिकेने भंगारही नाही सोडले; कोट्यावधींचा घोटाळा

संत झेव्हीअर्स मैदान आणि स्वर्गीय प्रमोद महाजन मैदानात यापूर्वी अशा प्रकारच्या भूमिगत टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी स्वतंत्र टेंडर मागविण्यात आले आहेत. 100 मीटर लांब, 50 मीटर रुंद आणि 6 मीटर खोल अशा या टाक्या असतील. दादर येथील भूमिगत टाकीची साठवण क्षमता 60 हजार घन मीटर आणि परळ येथील टाकीची क्षमता 40 हजार घनमीटर असेल. यासाठी महानगर पालिकेने 130 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. आता दोन्ही टाक्यांच्या बांधकामासाठी महानगर पालिका 67 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. यात, परळ येथील टाकीसाठी 33 कोटी आणि दादर येथील टाकीसाठी 34 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

Hindmata Parel
प्लास्टिक कंटेनरची मुंबई पालिकेकडून चढ्या दराने खरेदी?

हिंदमाता परळ परिसरात पावसाचे पाणी साचल्यावर संपूर्ण वाहतूक बंद पडते. यावर उपाय म्हणून येथील दोन्ही उड्डाण पुलामधील रस्त्यांची उंची वाढवून पालिकेने हे पूल जोडले आहेत. त्याच बरोबर पावसाचे पाणी थेट नाल्यांमध्ये जाण्याऐवजी हे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये अडविण्यात येणार आहे. समुद्राची भरती ओसल्यावर तसेच पावसाचा जोर ओसरल्यावर हे पाणी नाल्यात सोडण्यात येईल.

Hindmata Parel
मुंबई महापालिकेने 'करून दाखवलं'; बंद शाळांवर ९० कोटींचा खर्च

यापूर्वी ब्रिमेस्ट्रोवॅड प्रकल्पाअंतर्गत रे रोड येथे उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन तयार करण्यात आले होते. तेव्हा या भागातील पाणी तुंबण्याची समस्या कमी होईल असा दावा प्रशासनाकडून केला जात होता. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यानंतर पुन्हा या भागातील पर्जन्यवाहिन्यांची क्षमता वाढविण्याबरोबरच इतरही कामे केली जात आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com