जुहू ते सीडी बर्फीवालापर्यंत होणार उड्डाणपूल; ३५० कोटींचे टेंडर

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : अंधेरी पश्चिमेकडील जुहू वर्सोवा मार्गापासून सीडी बर्फीवालापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने ३५० कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

BMC
मुंबई मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेबद्दलची 'ती' याचिका मागे

अंधेरी पश्चिमेकडील जुहू वर्सोवा मार्गापासून सीडी बर्फीवालापर्यंत हा उड्डाणपूल बांधून पूर्ण झाल्यानंतर जेव्हीपीडी जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकेल, असा महापालिकेचा दावा आहे. या उड्डाणपुलासाठी ३५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई महापालिकेने या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. कार्यादेश दिल्यापासून पुढील तीन वर्षांत हा उड्डाणपूल बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. हिंदमाता उड्डाणपूल आणि परेल उड्डाणपूलादरम्यान बांधण्यात आलेल्या उन्नत मार्गाजवळ (कनेक्टर) आता पादचारी पूलही बांधण्यात येणार आहे. या पूलासाठी सुमारे ४ कोटी ८७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

BMC
मुंबई मेट्रो-3 च्या वाढीव १०,२६९ कोटींच्या खर्चाला मान्यता

दरवर्षी पावसाळ्यात हमखास पाणी साचणाऱ्या हिंदमाता परिसरात अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र या उपाययोजनांना यश येत नव्हते. त्यामुळे परिसरात पाणी साचत होते व या पाण्याचा निचराही वेगाने होत नव्हता. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्यासाठी गेल्यावर्षी मुंबई महापालिकेने हिंदमाता उड्डाण पूल आणि परेल उड्डाणपूलादरम्यानच्या रस्त्याची उंची १.२ मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला. अडीच महिन्यात काम पूर्ण करून जून २०२१ मध्ये पावसाळ्यापूर्वी हा उन्नत मार्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात पूलावरून वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठा वळसा घालून जावे लागत होते. यावर उपाय म्हणून महापालिकेच्या पूल विभागाने आता येथे पादचारीपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पूलासाठी साधारण चार कोटी ८७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा पूल पूर्ण होण्यास दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच या पूलाला सरकता जिनाही असेल अशी माहिती पूल विभागाचे मुख्य अभियंता सतीश ठोसर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com