Mumbai : कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी महापालिकेचे टेंडर; 14 डिसेंबरपर्यंत...

Artificial Rain
Artificial RainTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : प्रदूषण नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुंबई महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे. इच्छुक कंपन्यांना १४ डिसेंबरपर्यंत टेंडर भरता येणार आहे. निवड झालेल्या कंपनीला पुढील तीन वर्षांसाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कंत्राट दिले जाणार आहे.

Artificial Rain
Uddhav Thackeray : धारावीपाठोपाठ 'हे' आणखी तीन प्रकल्पही अदानीच्या घशात? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

कृत्रिम पावसासाठी आवश्यक वातावरण, वेळ, ठिकाण यांची निश्चिती  आणि मगच या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेला पाण्याच्या टँकरवर येत असलेला खर्च कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्यास वाचवता येणार आहे. त्यामुळे महापालिका कृत्रिम पावसाची चाचपणी करेल, असे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर आता त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक संशोधन, माहिती महापालिका प्रशासनाकडून घेतली जात आहे. मात्र, टेंडर प्रक्रियेसाठी अर्ज करणारी कंपनी ही या तंत्रज्ञानातील पारंगत अशीच असेल त्यांचीच निवड करण्यात येणार आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याचा किमान सात वर्षांचा अनुभव असावा हे निकष कंपनीच्या निवडीसाठी महत्त्वाचे आहेत.

Artificial Rain
Mumbai : 'त्या' कंत्राटदाराला निष्काळजीपणा भोवला; बीएमसीने ठोठावला तब्बल 1 कोटी 33 लाखांचा दंड

मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला तर प्रदूषणाची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आपल्याला मदतच होणार असल्याने त्यासंबंधी जाहिरात महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून काढण्यात आली आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी परिसरात आर्द्रता ७० टक्के असणे आवश्यक आहे. योग्य त्या ढगांची निवड करून त्यात ठराविक प्रकारच्या कणांचे बीजारोपण करण्यात येते. हा कण पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होत जाते. याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. उष्ण तसेच शीत ढगांसाठी कृत्रिम पावसाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. विमानाने फवारणी करणे, रॉकेटने ढगात रसायन सोडणे आणि जमिनीवर रसायनाचे ज्वलन करणे अशा तीन पद्धती वापरून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जातो. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com