Mumbai : मुंबईतील 5 हजारांवर बांधकामांना 'ते' नियम बंधनकारक; महापालिकेची मोहीम

Mumbai
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने मुंबई महानगरपालिकेने रस्ते व बांधकामांसह सर्व प्रकारच्या कामांच्या ठिकाणी ठेकेदारांना पर्यावरण व्यवस्थापन नियोजनाचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. ही नियमावली मुंबईत सुरू असलेल्या पाच हजारांवर बांधकामांना सक्तीची आहे. याबाबत ठेकेदारांकडून लेखी हमी घेतली जात आहे.

Mumbai
Mumbai Metro : Good News! पूर्व पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या 'या' मेट्रो मार्गाचे...

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्यात हवेची गुणवत्ता घटत असल्याचे दिसून येत आहे. धुरक्यामुळे कमी होणारी दृश्यमान्यता आणि प्रदूषणामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी प्रदूषणाने अत्युच्च पातळी गाठत 'एअर क्वालिटी इंडेक्स' अर्थात 'एक्यूआय' अडीचशेच्या पार गेला होता. त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली होती. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने गेल्या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी 27 प्रकारची नियमावली जाहीर केली. ही नियमावली मुंबईत सुरू असलेल्या पाच हजारांवर बांधकामांना पाळणे बंधनकारक करण्यात आले. यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये सब इंजिनीयरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत सद्यस्थितीत सरासरी 'एक्यूआय' 130 पर्यंत आहे. त्यामुळे महापालिकाही सजग झाली आहे.

Mumbai
Mumbai : मुलुंड ते राष्ट्रीय पार्क ‘रोपवे’ प्रस्तावाचा पर्यटन विभागाने मागवला अहवाल

हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 'एअर क्वालिटी इंडेक्स' 'एक्यूआय' तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत 'एक्यूआय' 'अतिशय शुद्ध हवा' मानली जाते.

51 ते 100 'समाधानकारक',
101 ते 200 'मध्यम'
201 ते 300 पर्यंत 'खराब'
301 ते 400 'अतिशय खराब'

14 नोव्हेंबरचा 'एक्यूआय' -
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स 142
सिद्धार्थ नगर, वरळी 228
माझगाव 145
मालाड पश्चिम 142
नेव्ही नगर, कुलाबा 168
कांदिवली पश्चिम 166
घाटकोपर 186
बोरिवली पूर्व 154

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com