प्रदूषणमुक्त मुंबईसाठी 'ती' यंत्रे बसवणार; ६ कोटींचे टेंडर

Pollution
PollutionTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) प्रदूषणवाढीमागच्या कारणांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी सिस्टीम ऑफ एअर क्‍लालिटी ऍण्ड वेदर फॉरकास्टिंग ऍण्ड रिसर्च ही स्वयंचलित प्रदूषण मापक यंत्रे बसवण्यात येणार आहेत. ही यंत्रे बसवण्यासाठी महापालिकेची टेंडर प्रक्रिया सुरु असून त्यावर सहा कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. येत्या काळात मुंबईत ५५ ठिकाणी ही प्रदूषण मापके बसवण्यात येणार आहेत.

Pollution
कल्याण-शीळ फाटा रस्त्याचे सहापदरीकरण; ५६१ कोटीच्या खर्चास मान्यता

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. २०२० च्या मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव त्यानंतर मुंबईतील प्रदूषणात घट झाली होती; परंतु लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच पुन्हा प्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष आवाज फाउंडेशनच्या अहवालातून समोर आला. त्यामुळे आता मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Pollution
नवी मुंबई एयरपोर्ट परिसरात बांधकाम उंचीची मर्यादा तिप्पट; आता...

यासाठी सहा कोटी रुपये खर्च करून सहा ठिकाणी सिस्टीम ऑफ एअर क्‍लालिटी ऍण्ड वेदर फॉरकास्टिंग ऍण्ड रिसर्च ही स्वयंचलित प्रदूषण मापक यंत्र बसवणार असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त अतुल राव यांनी सांगितले. दरम्यान, प्रदूषण मापक यंत्रामुळे प्रदूषण पातळीची नोंद ऍप्लिकेशनवरही उपलब्ध होणार आहे. भविष्यात ५५ ठिकाणी अशीच प्रदूषण मापके बसवणार असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com