ओला, घातक कचरा नष्ट करण्यासाठी बीएमसीचे १७ प्रकल्पांकरिता टेंडर

garbage
garbageTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) ओल्या कचऱ्याची विकेंद्रित स्वरुपात विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई शहरात नऊ ठिकाणी दोन मेट्रिक टन क्षमतेची बायोमिथेशन सयंत्रे उभारण्यासाठी टेंडर प्रकिया सुरु केली आहे. डम्पिग ग्राउंडवरील क्षमता कमी करण्यासाठी विकेंद्रित स्वरूपात विविध प्रक्रियेद्वारे ओल्या कचऱ्यावर प्रकिया करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच मुंबईत निर्माण होणाऱ्या सुमारे ७० टन प्रतिदिन इतक्या घरगुती घातक कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने तीन प्रकल्प कार्यान्वित केले असून, आठ नवीन प्रकल्पांसाठी टेंडर मागविण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी सांगितले.

garbage
शिंदे-फडणवीसांच्या 'त्या' आदेशाला वाटाण्याच्या अक्षता; अद्याप यादी

स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०२१ पर्यंत १२,८१९ आसनांची ५६२ स्वच्छतागृहे बांधून पूर्ण झाली आहेत. ६,६३५ आसनांच्या २६६ स्वच्छतागृहांचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच २०२२ वर्षासाठी १९,४५४ आसने असलेली ८२८ सामुदायिक स्वच्छतागृहे बांधण्याचे लक्ष्य आहे. घन कचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसाठी ४६ वसाहतींमध्ये केवळ ५,५९२ सेवा निवासस्थाने उपलब्ध आहेत. घन कचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना चांगल्या निवासी सुविधा देण्याकरिता उपलब्ध ३० वसाहतींचा पुनर्विकास करून १३ हजार निवासस्थाने निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.

garbage
मुंबई मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेबद्दलची 'ती' याचिका मागे

देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजित आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ६०० टन प्रति दिन क्षमतेच्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून ऊर्जानिर्मिती करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नेमणूक केलेली आहे. प्रकल्पाचे आखणी व बांधकामाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पामधून सुमारे ६०० टन प्रति दिन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून सुमार चार मेगावॉट प्रतिदिन ऊर्जानिर्मिती होईल. मुलुंड क्षेपणभूमी येथे अस्तित्वात असलेल्या कचऱ्यावर योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून जमीन पुन:प्राप्त करण्यासाठीच्या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे सात दशलक्ष टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे, असेही चहल यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com