गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पग्रस्तांसाठी 189 कोटींचे टेंडर

Mumbai

Mumbai

Tendernama

Published on

मुंबई (Mumbai) : गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी कांजूरमार्ग पश्‍चिम येथे वसाहत उभारण्यात येणार आहे. या वसाहतीत 920 घरांसह मंडईही उभारण्यात येणार असून मुंबई महापालिका त्यासाठी 189 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

<div class="paragraphs"><p>Mumbai</p></div>
EXCLUSIVE: मुंबै बँक बोगस कर्ज वाटप; धस, दरेकरांवर गुन्ह्याचे आदेश

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या आड येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन जवळच्या ठिकाणीच करण्यात येणार आहे. त्यासाठी कांजूरमार्ग पश्‍चिमेला लाल बह्हादूर शास्त्री मार्गाला लागून असलेल्या आरक्षित भूखंडावर महापालिका ही प्रकल्पग्रस्तांची वसाहत उभारणार आहे. 25 मजली इमारतींमध्ये 300 चौरस फुटाची 920 घरे तयार करण्यात येणार आहेत. त्याच समाजकल्याण केंद्र आणि पालिका मंडईसाठी स्वतंत्र तीन मजली इमारत बांधण्यात येईल. या प्रकल्पात काही दुकानेही बाधित होणार आहेत. त्यांचे पुनर्वसन या मंडईत करण्यात येणार आहे.

<div class="paragraphs"><p>Mumbai</p></div>
IMPACT : ठग्ज ऑफ पुणे; बोगस लाभार्थ्यांकडून लाखोंच्या वसुलीचे आदेश

महापालिकेने यासाठी 189 कोटी 80 लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार करुन टेंडर मागवली आहेत. महापालिकेने आता प्रकल्पग्रस्तांसाठी स्वत: वसाहती उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी पालिका इमारती बांधून घेईल. तसेच, खासगी जमीन मालकांकडूनही अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक झोनमध्ये 10 हजार घरे उभारण्याचे ध्येय महापालिकेने ठेवले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com