कोस्टल रोडच्या खर्चात वाढच; आता विशेष निधीतून ५०० कोटी

Coastal Road
Coastal Road

Tendernama

Published on

मुंबई (Mumbai) : 'कोस्टल रोड’च्या (Coastal Road) कंत्राटदार, सल्लागाराला देण्यासाठी महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेला २ हजार कोटींचा निधी अपुरा पडल्याने आता ‘विशेष निधी’ मधून ५०० कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत. यासंदर्भातील माहितीपर प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

Coastal Road
EXCLUSIVE:मंत्री पाडवींच्या आशीर्वादाने ठेकेदाराचे ४५ कोटींचे पोषण

तब्बल १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च होणार असलेल्या देशातील पहिल्या ‘कोस्टल रोड’च्या कामासाठी पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या २ हजार कोटी रुपयांमधून आतापर्यंत या कामावर पालिकेने १ हजार ९९६ कोटी खर्च केले आहेत. जानेवारी २०२२ पर्यंत या कामासाठी आणखीन ५०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हे ५०० कोटी रुपये ‘विशेष निधी’ (पायाभूत सुविधा विकास निधी) मधून उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘कोस्टल रोड’ चे काम निधी अभावी थांबू नये व हे काम युद्धपातळीवर सुरुच ठेवण्यासाठी महापालिकेने ‘विशेष निधी’ मधून आवश्यक ५०० कोटींची तातडीने उचल घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Coastal Road
टेंडर प्रक्रिया टाळून 93 लाखांची खरेदी;पुरवठा एकाचा बिले दुसऱ्याची

मुंबईतील पश्चिम उपनगरापासून शहर भागापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी व इतर उद्देश साध्य करण्यासाठी बहुउद्देशीय १०.५८ किलोमीटर लांबीच्या या ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. सध्या या ‘कोस्टल रोड’ चे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० टक्के काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. हे काम निधी अभावी बंद पडू नये यासाठी पालिका अधिक काळजी घेत आहे.

Coastal Road
निवडणूक येताच सत्ताधारी-विरोधकांत दिलजमाई; रस्त्यांसाठी 'टेंडर'

या ‘कोस्टल रोड’ च्या कामाअंतर्गत पॅकेज १, २ व ४ चे कंत्राटदार, सल्लागार व साधारण सल्लागार यांना त्यांचा कामाचा मोबदला जानेवारी २०२२ पर्यंत देण्यासाठी ५०० कोटींची आवश्यकता होती. त्यामुळेच पालिकेने ५०० कोटी रुपये ‘विशेष निधी’ (पायाभूत सुविधा विकास निधी) मधून उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष निधी अंतर्गत जमा होणारी रक्कम ही मुंबई शहरातील पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्प कामाकरिता वापरायची आहे. त्या अनुषंगाने कोस्टल रोड आणि गोरेगाव-अंधेरी लिंक रोड या कामांसाठी होणारा खर्च हा या विशेष निधीमधून करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com