Mumbai : 8 हजार कोटींची मदत करुनही 'बेस्ट'ची परिस्थिती जैसे थे!

BEST Bus Mumbai
BEST Bus MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने 'बेस्ट'ला अतिरिक्त तीन हजार कोटींची आर्थिक मदत देण्यास नकार दिला आहे. महापालिकेने गेल्या काही वर्षांत 'बेस्ट'ला आठ हजार कोटींची आर्थिक मदत दिली आहे. तरीदेखील 'बेस्ट'च्या उत्पन्नात कोणतीही वाढ झालेली नाही किंवा आर्थिक स्थितीही सुधारलेली नाही. त्यामुळे पुन्हा मदत देण्यास नकार देत आतापर्यंत दिलेल्या कोट्यवधींच्या मदतीचा हिशेब द्या आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा, असे खडेबोलही महापालिकेने 'बेस्ट'ला सुनावल्याचे समजते.

BEST Bus Mumbai
Mumbai : अवघ्या दीड तासात मोहिम फत्ते! 'त्या' महाकाय गर्डरचे यशस्वी लॉन्चिंग

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या 'बेस्ट'मधून दररोज 35 लाख मुंबईकर प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकरांसाठी 'बेस्ट'चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून 'बेस्ट'ची आर्थिक स्थिती खालावल्याने कामकाजाकर मोठा परिणाम होत आहे. एकेकाळी स्वतःच्या पाच हजार बसेसची संख्या आता थेट 1097 पर्यंत खाली आली असून बेस्टकडे भाडेपट्ट्यावरील 1941 बस आहेत. शिवाय दररोजच्या 42 ते 45 लाख प्रवाशांची संख्या आता 30 ते 35 लाखांवर आली आहे. आर्थिक स्थिती ढासळल्याने ही स्थिती ओढावल्यामुळे महापालिका 'बेस्ट'ला दरवर्षी कोट्यवधीची मदत करीत आहे. सन 2014-15 पासून मुंबई महानगरपालिकेकडून बेस्ट उपक्रमाला आठ हजार कोटींचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे, तर या वर्षी अर्थसंकल्पातही नऊ हजार कोटींचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा महापालिका आयुक्तांकडून करण्यात आली आहे. ही मदत टप्प्याटप्प्याने 'बेस्ट'ला मिळणारच आहे. मात्र या व्यतिरिक्त तीन हजार कोटींची मागणी बेस्टने महापालिकेकडे केली होती. मात्र महापालिका मुख्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत ही मदत देण्यास महापालिकेने नकार दिल्याचे समजते.

BEST Bus Mumbai
Mumbai : बीएमसीच्या मुदतठेवींना का लागली उतरती कळा? अवघ्या 2 वर्षांत 10 हजार कोटींची घट

'बेस्ट'च्या महाव्यवस्थापकांनी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून बेस्टला उपक्रमाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच बेस्टच्या परिवहन विभागास अंदाजे दरमहा 150 कोटी ते 180 कोटी रुपये इतकी आर्थिक तूट असल्याचे नमूद केले आहे, तर जुलै 2023 पर्यंत एकूण आर्थिक तूट 744.95 कोटी रुपये एवढी असल्याचे नमूद केले आहे. सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन सन 2019-20 पासून ते सन 2023-24 मधील 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेल्या तरतुदींमधून 3425.32 कोटी रुपये आणि या तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान रक्कम म्हणून 4643.86 कोटी रुपये असे एकूण 8069.18 कोटी एवढ्या रकमेचे अधिदान महापालिकेने 'बेस्ट'ला दिले आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com