बापरे! मोकाट जनावरांसाठी मुंबई महापालिका खर्च करणार १० कोटी

animals
animalsTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील रस्त्यांवर भटकणाऱ्या जनावरांसाठी आता महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) सोय करण्याचा निर्णय घेतला असून, या जनावरांसाठी अत्याधुनिक गोठा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गोठ्यासाठी महापालिका तब्बल १० कोटी ६६ लाख रुपये खर्च करणार आहे.

animals
औरंगाबादमध्ये १२० कोटींचे टेंडर फुगणार; …पैसाही जाणार

मुंबईतील रस्त्यांवरून पकडण्यात येणाऱ्या भटक्या जनावरांना ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या महापालिका पी/ उत्तर विभागातील मालाड (प.) येथील गोठ्याचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. रामचंद्र विस्तारित रस्ता वलनाई गाव येथील भूखंडावर पशुपालन कार्यालयांतर्गत जनावरांना ठेवण्यासाठी गोठा अस्तित्वात आहे. मात्र आता या गोठ्याचे नव्याने बांधकाम प्रस्तावित आहे.

animals
कर्जाच्या चक्रात फसलेल्या एसटी महामंडळाची अशीही फसवाफसवी

या कामाच्या अंतर्गत तळमजला अधिक दोन मजली कार्यालयीन इमारत आणि दवाखान्याकरिता इमारत, आजारी जनावरांसाठी एक छपरी, औषधासाठी एक छपरी, चाऱ्याकरिता छपरी, जनावरांसाठी आणखीन दोन छपऱ्या, शेळ्या-बकऱ्यांकरिता छपरी, जनावरांसाठी पाण्याची टाकी, दिव्यांग लोकांसाठी उतरंड आणि अग्निप्रतिबंधक यंत्रणा उभारणी आदी कामे करण्यात येणार आहेत.

animals
मुंबई पालिकेने काढले १६ कोटींचे टेंडर ठेकेदार म्हणतो अर्धेच बस्स!

सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीने या कामाच्या संरचनात्मक विश्लेषण आणि सिमेंट सलोह काँक्रीटचे संकल्पचित्राच्या कामाकरिता मे. पेडणेकर अँड असोसिएटस यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मे. रिद्धी इंटरप्राइजेस या कंत्राटदारामार्फत पावसाळ्यासह पुढील १८ महिन्यात हे बांधकाम करण्यात येणार असून त्यासाठी पालिका कंत्राटदाराला १० कोटी ६६ लाख रुपये देणार आहे.

animals
कंत्राटी डॉक्टरांसाठी मुंबई महापालिकेला वर्षाकाठी एक कोटींची 'भूल'

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकित मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावावर पालिकेतील विरोधी पक्ष भाजप व काँग्रेसकडून खरमरीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com