क्लीन मुंबईसाठी २० हजार टॉयलेट्स बांधणार; बीएमसी ऍक्शन मोडवर

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत शहरात तब्बल २० हजार शौचालये बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी महिलांसाठी २०० प्रसाधनगृहे बांधण्यात येणार आहेत. या शौचालयांसाठी जागा आणि त्यांची संख्या निश्चित करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभाग कार्यालयांना दिले आहेत.

BMC
EXCLUSIVE: सरकारमधील 25 आमदारांना हवेत 1200 कोटींचे टेंडर

नुकतेच मुंबई सुशोभीकरण प्रकल्पातील काही कामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी या प्रकल्पांतर्गत मुंबईत २० हजार शौचालये बांधण्याचा, तसेच ते २४ तास स्वच्छ ठेवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसेच या कार्यक्रमांतर्गत झोपडपट्ट्यांमध्येही शौचालये, सामुदायिक कपडे धुण्याची यंत्रणा (कम्युनिटी वॉशिंग मशिन) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली होती. या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी आता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.

BMC
मुंबईतील मॅनहोलच्या दुरुस्तीसाठी ३० कोटींचे टेंडर

मुंबईत किती ठिकाणी, किती शौचालये आहेत त्याची माहिती व सांख्यिकी गोळा करण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. संपूर्ण मुंबईतील सार्वजनिक प्रसाधनगृहांची नियमित देखभाल, स्वच्छता राखण्यासाठी धोरण तयार करण्यात येत असून त्यासाठी या माहितीचा वापर करण्यात येत आहे. सर्व सार्वजनिक प्रसाधनगृहे २४ x ७ तत्त्वावर चांगल्या पद्धतीने स्वच्छ राखली गेली पाहिजेत, यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आवश्यक त्या वसाहतींमध्ये नवीन प्रसाधनगृहे बांधावी, केवळ महिलांसाठी राखीव असलेली व त्यानुरुप सर्व सुविधा समाविष्ट असलेली किमान २०० प्रसाधनगृहे मुंबईत बांधावी, सर्व विभाग कार्यालयांनी आपल्या स्तरावर प्रसाधनगृहांची आवश्यक संख्या निश्चित करावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com