मुंबई (Mumbai) : मुंबईतील सर्वात जुन्या आणि वापरात असलेल्या पुलांपैकी एक प्रसिद्ध टिळक पूल पाडण्यात येणार आहे. रेल्वे पायाभूत सुविधा विकाम महामंडळातर्फे नव्या पुलाच्या उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम पुढच्या महिन्यापासून सुरु होणार आहे. नवा पूल हा केबल स्टेड म्हणजेच वांद्रे-वरळी सी-लिंक पूल ज्या पद्धतीने बांधण्यात आला आहे, त्या प्रकारचा पूल असेल. पुलाची लांबी ही 663 मीटर असून हा पूल 3+3 मार्गिकांचा म्हणजेच एकूण 6 लेनचा पूल असेल.
जुना पूल 97 वर्षे जुना असून दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडण्याचे काम हा पूल करतो. हा पूल पाडण्याच्या आधी नव्या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. नवा पूल हा देखील टिळक पुलाप्रमाणे रेल्वे मार्गिकांवरून जाणारा आणि दादर पूर्व-पश्चिमेला जोडणारा असेल. जोपर्यंत नवा पूल तयार होत नाही तोपर्यंत जुना टिळक पूल पाडण्यात येणार नाही आणि त्यावरून होणारी वाहतूकही थांबवण्यात येणार नाही. रेल्वे पायाभूत सुविधा विकाम महामंडळातर्फे नव्या पुलाच्या उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम पुढच्या महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. पूल उभारणीपूर्वीच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या असल्याचे महामंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. नवा टिळक पूल दिसायला अधिक आकर्षक व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुलाला आकर्षक लायटिंग करण्यात येणार असून पर्यटकांना फोटो काढता यावेत यासाठी सेल्फी पाँईंटही असणार आहेत.
2019 साली मुंबईतील सगळ्या पुलांची सुरक्षा तपासणी करण्यात आली होती, यामध्ये टिळक पूल हा देखील धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. लोअर परळमधला डिलाईल पूल पाडण्यात आल्यानंतर टिळक पुलावरून होणारी वाहतूक अधिकच वाढली होती. टिळक पुलामुळे दादर व्यतिरिक्त परळ, प्रभादेवी, माहिमकडेही जाणे सोपे होते. या पुलावरून होणारी वाहतूक लक्षात घेतल्यानंतर महामंडळाने नव्या पुलाचा एक भाग सुरू झाल्यानंतर हा पूल पाडण्याचे ठरवले आहे. हा पूल पाडल्यानंतर नव्या पुलाच्या दुसऱ्या भागाच्या उभारणीस सुरुवात करण्यात येणार आहे. नवा पूल हा केबल स्टेड म्हणजेच वांद्रे-वरळी सी-लिंक पूल ज्या पद्धतीने बांधण्यात आला आहे, त्याच प्रकारचा पूल असेल. पुलाची लांबी ही 663 मीटर असून हा पूल 3+3 मार्गिकांचा म्हणजेच एकूण 6 लेनचा पूल असेल.