Mumbai : 'DBS' रियल्टीला दिलेले 'ते' सोळाशे कोटींचे बीएमसीचे टेंडर रद्द!

BMC
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : डी.बी.एस. रियल्टी कंपनीला चांदिवली येथे पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत 4000 सदनिका बांधकामाचे दिलेले 1584 कोटींचे टेंडर मुंबई महापालिकेने रद्द केले आहे.

BMC
अबब! सरकारकडून 72 रुपये किलो सुतळीची 410 रुपयांना खरेदी; कोणी केला आरोप?

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पासाठी राखीव जमिनीवरच या सदनिका बांधण्याचे टेंडर मुंबई महानगरपालिकेने 4 मार्च 2022 रोजी या कंपनीला दिले होते. भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांनी हा घोटाळा उघडकीस आणून गेला महिनाभर मुख्यमंत्री कार्यालय तसेच मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व अन्य अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. नुकतीच यासंदर्भात आझाद मैदान पोलिस स्टेशन येथे सोमैया यांनी तक्रारही दाखल केली.                             

BMC
Mumbai : 'या' पुलाच्या कामात स्थापत्य कौशल्य का लागले पणाला? देशातला अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग!

मुंबई महापालिकेने नगरविकास विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांची ना हरकत प्रमाणपत्र (NOC) न घेता फसवणूक केली. या प्रकल्पाचे बांधकाम डी.बी.एस. रियल्टी ही कंपनी करणार होती. टेंडर देऊन 15 महिने उलटले तरी पुढे काहीच झालेले नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संबंधित जमीन देण्यास नकार दिला. दरम्यान, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हे टेंडर रद्द केले आहे. याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त व सुधार समितीचे तत्कालीन अधिकारी जबाबदार असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी डॉ. किरीट सोमैया यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com