Mumbai : शिवाजी पार्कच्या साफसफाईचे टेंडर रद्द

Shivaji Park
Shivaji ParkTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात नव्याने होणारी हिरवळ व माती टिकून राहावी, परिसराची स्वच्छता योग्य प्रकारे व्हावी, नागरिकांच्या मैदानासंबंधीच्या समस्या तत्काळ सोडवता याव्यात याकरिता पार्कचे परीक्षण व साफसफाई करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने मागवलेले तीन वर्षांसाठीचे टेंडर रद्द करण्यात आले आहे. महापालिकेने आता स्वतःच धूळमुक्तीचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Shivaji Park
Eknath Shinde : विकासकामांतून मुंबईचा चेहरामोहरा बदलणार

दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान आता मुंबई महापालिकेकडूनच धूळमुक्त करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कामगारांची व्यवस्था करून मैदानावर पाणी मारणे, हिरवळ जोपासणे, जमिनीचा समतोल राखणे अशी कामे केली जाणार आहेत. यामुळे महिन्याला होणारा एक कोटीचा खर्च तीन ते साडेतीन लाखांपर्यंत खाली येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यासाठी टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

Shivaji Park
Mumbai : नालेसफाईचे 180 कोटींचे टेंडर का रखडले?

छत्रपती शिकाजी महाराज मैदान धूळमुक्त करण्यासाठी महापालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पही उभारला आहे. शिवाय मैदान समतल करण्यासाठी मातीही टाकली आहे. या उपक्रमात आकश्यकतेनुसार लॉन, पाण्याची फवारणीची व्यवस्था करण्यात येत आहे, तर महत्त्वाचा प्रश्न ठरत असलेल्या धूळमुक्तीसाठी स्वतः काम करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

Shivaji Park
Mumbai : डेब्रिजमुक्तीसाठी बीएमसीचा मोठा प्लान; 2100 कोटींचे बजेट

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर अनेक खेळाडू घडतात. मात्र या ठिकाणच्या धुळीमुळे खेळाडूंसह मॉर्निंग वॉक आणि फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. यासाठी मैदानात रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना अमलात आणली आहे. या मैदानातील रेन वॉटरसह पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आल्या आहेत. गवताळ भाग तयार केला असून एप्रिल, मेपर्यंत संपूर्ण मैदानातील गवत वाढते. मैदान धूळमुक्तीसाठी 12 माळी आणि 12 सफाई कामगारांचा समावेश असेल. शिवाय कोणत्याही कार्यक्रमादरम्यान मैदानांकर खड्डे निर्माण झाल्यास ते बुजवून मैदानाचा भाग समतल करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com