दिव्यांग फ्रेंडली फूटपाथ:चेंबूरमध्ये पायलट प्रोजेक्ट, 17 कोटींचे..

footpath
footpathTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील दिव्यांगांसाठी रस्त्याच्या शेजारील फूटपाथ वापरासाठी सोयीचे व्हावेत, म्हणून मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. सध्या चेंबूर येथील महर्षी दयानंद चौक येथे राबविण्यात येणाऱ्या रस्त्यावर ७६८२ मीटरच्या फूटपाथचे प्रायोगिक तत्त्वावर काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी १७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. भविष्यात असे डिसेबल फ्रेंडली सुमारे ८०० किलोमीटरचे फुटपाथ मुंबईत तयार केले जाणार आहेत.

footpath
मुंबईत एसी ई-डबल डेकर बसचा मुहूर्त ठरला; 900 बसेसचा समावेश

त्याचसोबत मुंबईतील प्रस्तावित ४०० किमीच्या नवीन सिमेंट कॉंक्रिट रोडच्या शेजारचे फूटपाथ दिव्यांगांसाठी सोयीस्कर (डिसेबल फ्रेंडली) व्हावेत म्हणून उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठीचे प्रायोगिक प्रकल्प पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि मुंबई शहरात राबवण्यात येत आहेत. या प्रयोगाच्या यशानंतर संपूर्ण मुंबईत नव्याने निर्माण होणाऱ्या रस्त्यांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

footpath
दुसरीकडे उलाढाल दाखवून मिळविले जाते टेंडर; कंत्राट मिळविण्यासाठी..

मुंबईत पूर्व उपनगरात चेंबूर येथे सध्या दिव्यांगासाठी प्रायोगिक प्रकल्पाच्या निमित्ताने एक प्रयोग राबविण्यात येत आहे. याठिकाणी फुटपाथच्या ठिकाणी व्हीलचेअरसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात येत आहे. रॅम्पच्या चढ आणि उताराच्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या टाईल्स महानगरपालिकेकडून लावण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी काही एनजीओच्या माध्यमातूनही सूचना समोर आलेल्या आहेत. त्यामुळेच या सूचनांची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी शहरातील रस्ते वापरासाठी सोयीचे व्हावेत असा या नव्या योजनेचा मानस आहे. त्यामुळेच नव्या डिझाईनमध्ये विशिष्ट प्रकारच्या टाईल्स या दिव्यांगांना रस्त्यांचा सहज एक्सेस आणि ओळख व्हावी या अनुषंगाने वापरण्यात आल्या आहेत. एनजीओने टाईलचा वापर फुटपाथच्या मध्यभागीही करण्याची सूचना केली आहे. काही ठिकाणी बस स्टॉप आणि झाडांसाठी गार्डचा वापर करून फूटपाथचा वापर दिव्यांगांसाठी सहजसोपा व्हावा यासाठीची उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. सुमारे ८०० किलोमीटरचे फुटपाथ यानिमित्ताने तयार होणार आहेत.

footpath
नवी मुंबई एयरपोर्ट परिसरात बांधकाम उंचीची मर्यादा तिप्पट; आता...

चेंबूर येथील महर्षी दयानंद चौक येथे राबविण्यात येणाऱ्या रस्त्यावर ७६८२ मीटरच्या फूटपाथचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी १७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एकूण १५ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे. मे २०२३ रोजी हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाअंतर्गत बस स्टॉप आणि झाडांना गार्ड लावण्यात येणार आहे. रॅम्पच्या ठिकाणी चढ आणि उताराच्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची अशी टाईलची रचना असणार आहे. त्यामुळे हे फूटपाथ वापरणे दिव्यांगांना सोयीचे ठरावे, असा प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा महापालिकेचा प्रयत्न आहे. काही एनजीओनेही तशा सूचना केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com