Mumbai : वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गासाठी 74 कोटींचा सल्लागार

Mumbai Trans Harbour Link
Mumbai Trans Harbour LinkTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सागरी किनारा रस्ता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा ते दहिसर, भाईंदर या कामासाठी मुंबई महापालिका प्रशासन युद्धपातळीवर तयारी करीत आहे. या कामावर सुमारे १६,६२१ कोटींचा खर्च अपेक्षित असून सल्लागारासाठी ७४ कोटी खर्च केले जाणार आहेत. विस्तृत प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रक, आराखडे, टेंडर दस्तऐवज तयार करणे या जबाबदाऱ्या सल्लागारावर सोपविण्यात येणार आहेत.

Mumbai Trans Harbour Link
Mumbai : नाताळची भेट; विश्वविक्रमी समुद्री सेतू 25 डिसेंबरला खुला होणार?

सागरी किनारा मार्ग प्रकल्पाअंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतचे काम सध्या मुंबई महापालिकेतर्फे सुरू आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. हे ८२ टक्के काम पूर्ण झाले असून मे २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे, तर दहिसर- भाईंदर उन्नत रस्त्यासाठीही कंत्राटदार निश्चित करण्याची प्रक्रियाही नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे भविष्यात हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथून सागरी किनारा मार्गावरून थेट भाईंदर पश्चिमपर्यंत प्रवास करता येणार आहे. वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गासाठी आता सल्लागार नेमण्यात आले असून हा मार्ग गोरेगाव-मुलूंड जोडरस्त्यालाही जोडण्यात येणार आहे. हे काम चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Mumbai Trans Harbour Link
Mumbai Metro-3: 'टनेलिंग प्रोजेक्ट' आणि 'सेफ्टी इनिशिएटिव्ह' पुरस्काराने गौरव

वर्सोवा ते दहिसर या मार्गासाठी सहा भाग करण्यात आले आहेत. त्यात वर्सोवा ते बांगूर नगर, बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड, माईंडस्पेस मालाड ते चारकोप उत्तरेकडे जाणारा बोगदा, चारकोप ते माईंडस्पेस दक्षिणेकडे जाणारा समांतर बोगदा, चारकोप ते गोराई आणि गोराई ते दहिसर असे सहा टप्प्यांत हे काम होणार आहे.

* मरीन ड्राइव्ह ते वरळी सी लिंकचे दक्षिण टोक - १०.५८ किलोमीटर (मुंबई महापालिकेचा प्रकल्प)
* वांद्रे-वरळी सी लिंक - ५.६ किमी (अस्तित्वात आहे)
* वांद्रे-वर्सोवा सी लिंक - १७ किमी (एमएसआरडीसी)
* वर्सोवा-दहिसर जोडरस्ता - २०.४ किमी (मुंबई महानगरपालिका)
* दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम उन्नत रस्ता - ५ किमी (मुंबई महानगरपालिका)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com