मुंबई मेट्रोला 'या' 2 मार्गिकांवर असे मिळणार 1500 कोटींचे उत्पन्न

Mumbai Metro
Mumbai MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : 'मेट्रो २ अ' (दहिसर – डी. एन. नगर) आणि 'मेट्रो ७' (दहिसर – अंधेरी) मार्गिकांवर जाहिरातीचे हक्क विकून महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात 'एमएमएमओसीएल'ला पुढील १५ वर्षांमध्ये १५०० कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. चालू वर्षात त्यापैकी १०० कोटी रुपये महसूल अपेक्षित असून आतापर्यंत ७० कोटी जमा झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महसूल मिळविणारा भारतातील हा पहिला सर्वांत छोटा मेट्रो मार्ग ठरला आहे.

Mumbai Metro
नागपुरातील गडकरींच्या 'या' प्रकल्पात फडणवीस लक्ष घालताहेत का?

मेट्रो मार्गिकेसाठी तिकीट विक्री हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र तिकीट विक्रीतून अपेक्षित महसूल मिळत नसल्याने देशभरातील मेट्रो मार्गिका तोट्यात आहेत. परिणामी, एमएमएमओसीएलने महसूल वाढविण्यासाठी इतर स्रोतांचा शोध घेतला असून मेट्रो गाड्या, स्थानक, मेट्रो मार्गिकेच्या खांबावर जाहिरातीचे अधिकार खासगी कंपन्यांना देण्यात आले आहेत. स्थानकांच्या नावाचे अधिकार खासगी कंपन्यांना देण्यात आले आहेत. 'एमएमएमओसीएल'ला या माध्यमातून वर्षाकाठी १०० कोटी रुपये महसूल मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षात त्यापैकी ७० कोटी एमएमएमओसीएलच्या तिजोरीत जमा झाले असून उर्वरित ३० कोटी रुपये लवकरच तिजोरीत जमा होतील, अशी अपेक्षा आहे. तसेच जाहिराती आणि स्थानकांच्या नावाच्या अधिकारीपोटी पुढील १५ वर्षांमध्ये 'एमएमएमओसीएल'ला १५०० कोटी रुपये महसूल मिळेल, अशी माहिती मुंबई 'एमएमएमओसीएल'मधील उच्चपदस्थांनी दिली.

Mumbai Metro
कल्याण-डोंबिवली-टिटवाळा वासियांना MMRDAकडून गुड न्यूज!

या दोन्ही मार्गिकांदरम्यानच्या ३० स्थानकांवरील ८० हजार चौरस फूट जागा भाड्याने देण्यात आली आहे. यातील १७ हजार ५०० चौरस फूट जागा एकट्या अंधेरी स्थानकातील आहे. ही जागा विविध प्रकारच्या गाळेधारकांना भाड्याने देण्यात आली आहे. स्थानकांच्या नावाचे अधिकार आणि मोबाइल टॉवरसाठी जागा देऊन उत्पन्न मिळविण्यात आले आहे.

Mumbai Metro
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर घडणार इतिहास; देशातील सर्वांत उंच...

'मेट्रो २ अ' आणि 'मेट्रो ७' मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला अद्याप प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न कमी आहे. इतर स्रोतांमधून मिळणारा महसूल 'एमएमएमओसीएल'साठी महत्त्वाचा ठरला आहे. मोठ्या प्रमाणावर महसूल मिळविणारा भारतातील पहिला सर्वात छोटा मार्ग असल्याचा दावा 'एमएमएमओसीएल'कडून करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com