Mumbai Metro: मुंबईकरांना लवकरच मिळणार गुड न्यूज! मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा?

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कुलाबा - वांद्रे - सिप्झ या (मेट्रो-3) मार्गिकेतील आरे-बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रमाणपत्र मिळवून विधानसभा निवडणुकीच्या आधी ही मेट्रो सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे.

Eknath Shinde
'ते' टेंडरही 'अदानी'लाच!; तब्बल 25 वर्षे कंपनी राज्याला वीज पुरवणार

ही मार्गिका मुंबई मेट्रो-3 मुंबईतील एकूण 6 व्यावसायिक उपनगरे, 30 कार्यालयीन क्षेत्रे, 12 मोठ्या शैक्षणिक संस्था, 11 प्रमुख रुग्णालये, 10 वाहतूक केंद्रे व मुंबईतील दोन्ही विमानतळांना (देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय) जोडणार आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) 33.5 किमी लांबीच्या भुयारी मेट्रो 3 चे काम सुरू आहे. या मार्गिकेतील आरे - बीकेसी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून चाचण्या करून घेत प्रमाणपत्र घेणे बाकी आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मेट्रो वाहतूक सेवेत दाखल करता येत नाही.

Eknath Shinde
सरकारी जमिनीवर विनापरवाना कोट्यवधींचे कर्ज; महसूल मंत्री विखे पाटील यांच्या फाउंडेशनच्या अडचणीत वाढ

60 टक्के मुंबईकर मेट्रो 3 मार्गिका वापरण्यासाठी उत्सुक असून त्यातील 60 टक्के नागरिक सध्या रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करणारे आहेत. अर्थ ग्लोबल या वाहतूक सेवेतील सल्लागार संस्थेने मेट्रो 3 च्या वापराबाबत केलेल्या सर्वेक्षणातून मुंबईकरांचा कल स्पष्ट झाला आहे.

भुयारी मेट्रो हा अतिजलद वाहतूक व्यवस्थेचा पर्याय असल्याने आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे या नव्या दळणवळणाच्या साधनाचा वापर करण्यास नागरिक अधिक उत्सुक आहेत.

Eknath Shinde
Mumbai : कोस्टल रोडचे आणखी एक पाऊल पुढे; 90 टक्के मोहिम यशस्वी, मार्च 2025 पर्यंत प्रकल्प पूर्ण

सध्या रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांपैकी 63 टक्के नागरिकांना मेट्रो 3 चा पर्याय खुणावतो आहे. तर सध्या लोकल आणि बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांपैकी 59 टक्के तर चारचाकी, दुचाकीने प्रवास करणाऱ्यांपैकी 57 टक्के नागरिक मेट्रो 3 चा वापर करण्यास उत्सुक आहेत.

दरम्यान, या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील वाहतूक पुढच्या वर्षी सुरू केली जाऊ शकते. 33.5 किमी लांबीची मेट्रो मार्गिका 3 ही मुंबईच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारी महत्त्वपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com