Mumbai Metro MD : IAS रुबल अग्रवाल मुंबई मेट्रोचा 'रुबाब' वाढविणार का?

Rubal Agrawal
Rubal AgrawalTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : निर्णयाचा धडाका आणि अंमलबाजावणीतील सातत्य यामुळे सदैव चर्चेत राहणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल (IAS Rubal Agrawal) यांच्याकडे आता मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) नियंत्रणाची जबाबदारी आली आहे.

राज्य सरकारने अग्रवाल यांची एमएमआरडीएच्या (MMRDA) अतिरिक्त आयुक्तपदावर बदली केली असून, त्यांच्याकडे आता मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची (Mumbai Metro MD) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेट्रोचा 'रुबाब' रुबल अग्रवाल यांच्या काळात वाढणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Rubal Agrawal
Nashik : पाच वर्षे लांबवलेले पेस्टकंट्रोलचे टेंडर आचारसंहिता काळात अचानक झाले अत्यावश्यक

खमक्या महिला IAS अधिकारी म्हणून ओळख

धडाकेबाज निर्णयामुळे पुणे महापालिकेतील अग्रवाल यांची कारकीर्द चांगलीच चर्चेत राहिली. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त म्हणूनही त्यांनी चांगली कामगिरी केली. अग्रवाल यांच्या कामाची राज्य सरकारने दखल घेतली असून, त्यांच्याकडे आता महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे परिचित असलेल्या अग्रवाल मुंबई मेट्रोची 'गती' कशी वाढवितात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अश्विनी भिडे यांची बदली झाल्यानंतर मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे होता. आता ही जबाबदारी अग्रवाल यांच्याकडे आली आहे. सोमवारी मुखर्जी यांच्याकडून अग्रवाल यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला.

Rubal Agrawal
Nashik : नाशिक जिल्ह्यात 15 वाळू डेपोंसाठी चौथ्यांदा फेरटेंडर; निवडणूक आयोगाकडे परवानगी मागणार

शिर्डी संस्थानच्या पहिल्या महिला सीईओ

भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८च्या बॅचच्या IAS अधिकारी असलेल्या अग्रवाल यांनी मागील 15 ते 16 वर्षे राज्यातील प्रशासनात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची कारकीर्दही गाजली होती. तिथे त्यांनी आक्रमकपणे प्रशासकीय यंत्रणेत बदल घडवत बड्या राजकारण्यांना ताळ्यावर आणले होते.

शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (CEO) जबाबदारीही त्यांच्याकडे होते. शिर्डी संस्थानच्या त्या पहिल्या महिला सीईओ ठरल्या होत्या. संस्थानच्या रखडलेल्या योजनांना वेग देण्यात अग्रवाल यशस्वी ठरल्या होत्या.

Rubal Agrawal
Nashik : नाशिक जिल्ह्यातील आरटीओ मालामाल! तब्बल 454 कोटींचा...

पुण्यात कोरोना काळात निर्णयाचा धडाका

अग्रवाल यांची २०१९ मध्ये पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर बदली झाली. या काळात त्यांनी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. कोरोनाच्या साथीच्या काळात पुणे हे देशातील सर्वाधिक संसर्ग असलेले शहर ठरले होते. यावेळी आरोग्य खात्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत कोरोनाच्या लाटेशी दोन हात केले होते.

महापालिकेची आरोग्य यंत्रणा व्यापक करत पुण्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. त्यांच्या नेतृत्वाखाली कोरोना साथीच्या काळात महापालिकेने ७२ रुग्णालयांत उपचार व्यवस्था उभारण्यापासून जम्बो कोविड सेंटरही सुरू केले होते.

कोविड काळात अग्रवाल यांच्या निर्णयाचा धडाका दिसून आला आणि त्यांनी पुणेकरांची मने जिंकली. अतिरिक्त आयुक्त, जम्बो कोविड सेंटरच्या प्रमुखपदाची जबाबदारी असतानाच ऐन कोविडच्या काळात अग्रवाल यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशनच्या सीईओ (DEO, Pune Smart City Development Corporation) म्हणून नेमणूक करण्यात आली.

Rubal Agrawal
MGNAREGA : केंद्राने निधी थकवूनही राज्यात रोजगारहमीच्या निधी खर्चात 50 टक्के वाढ; विक्रमी 4,476 कोटींची कामे पूर्ण

'स्मार्ट सिटी'ला दिली गती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाला गती देण्यात अग्रवाल यांचा पुढाकार राहिला. पुण्यात महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर अग्रवाल यांची राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तपदावर बदली करण्यात आली.

कुपोषण रोखण्यापासून महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या खात्यात अग्रवाल यांनी धाडसी निर्णय घेतले. त्याचा परिणाम म्हणजे, राज्याच्या प्रशासकीय सेवेतील मानाचा माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासकाचा पुरस्कार अग्रवाल यांना मिळाला. आधी ठाकरे सरकार आणि त्यानंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये त्यांच्याकडे हे खाते कायम राहिले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अग्रवाल यांची या खात्यातून महिला आर्थिक विकास महामंडळात बदली झाली. त्यानंतर काही दिवसांतच मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई मेट्रोला अधिक गतीमान करण्यासाठी अग्रवाल यांची एमएमआरडीएत बदली करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com