मुंबई (Mumbai) : बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-३ची (Mumbai Metro-3) सुमारे ९६ टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे म्हणजेच मेट्रो स्थानकांचे सुशोभीकरण, स्टेशन आणि प्लॅटफॉर्मची कामेही सध्या शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे आरे-बीकेसी हा मेट्रोचा पहिला टप्पा पुढील महिन्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सुमारे ३७,००० कोटी खर्च झाले आहेत.
यापूर्वी मेट्रो -३ प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे आरे-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मार्गावरील मेट्रोच्या रिकाम्या डब्याची चाचणी म्हणजे 'ड्राय रन' करण्यात आले होते. त्यावेळी मेट्रोचा वेग 95 किमी प्रतितासपर्यंत होता. आता पुढील आठवड्यात 'लोडेड ट्रायल्स' सुरू करण्याची अपेक्षा आहे. यात मेट्रोच्या प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांच्या वजनाच्या दगडाने भरलेल्या पिशव्या ठेवण्यात येतील.
या चाचणीतून प्रवाशांच्या वजनाने भरलेली मेट्रो मार्गावर कशा पद्धतीने धावते याची खात्री करण्यात येईल. या व्यतिरिक्त मेट्रोच्या चाचणीदरम्यान सरळ ट्रॅक आणि वळणाचे ट्रॅक यासारख्या गोष्टी देखील बघितल्या जातील.
मेट्रो प्रवाशांसाठी खुली करण्यापूर्वी सर्व अडथळे दूर करण्यात येत आहेत. जेणे करून मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही. मेट्रोच्या चाचण्यानंतर डिझाईन आणि सुरक्षा (RDSO) मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) या सर्वांच्या मापदंडांची पूर्तता करणेही महत्वाचे असते.
बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौकापर्यंतचा मेट्रोचा दुसरा टप्पा देखील प्रगतीपथावर आहे. या टप्प्यातील मेट्रो ही ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन (ATO) मोडमध्ये काम करणार आहे. आरे-बीकेसी मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी कामासाठी जवळपास ३७,००० कोटी रुपये खर्च झाले आहे. आरे-बीकेसी मेट्रोचा पहिला टप्पा मे अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
मेट्रोचे काम जवळपास ९६ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामे म्हणजे मेट्रो स्थानकांचे सुशोभीकरण, स्टेशन आणि प्लॅटफॉर्मची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यानंतर दुसरा टप्पा बीकेसी ते कफ परेडपर्यंत असणार आहे.
या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत दुसरा टप्पा देखील सुरू होण्याची अपेक्षा आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात सीप्झ ते बीकेसीपर्यंत ८ स्थानके असतील आणि दुसऱ्या टप्प्यात बीकेसी आणि कफ परेड दरम्यान १८ स्थानके असणार आहेत.