Mumbai Metro-3 : ॲक्वा लाईनवरून प्रवास करणाऱ्यांना मेट्रो देणार सुखद धक्का!

Mumbai Metro
Mumbai Metro Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मेट्रो-३ या एक्वा (Aqua Line) लाईनवरील प्रवास सुलभ करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (MMRC) समन्वयातून मल्टी-मॉडल इंटीग्रेशनसाठी (MMI) विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.

Mumbai Metro
राज्य सरकारने पुणे महापालिकेत समाविष्ट 32 गावांबाबत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई मेट्रोच्या कंत्राटदारांनी बीकेसी वगळता (जेथे आयकर जंक्शनवर मोठ्या पुनर्स्थापनेचे काम सुरू आहे जे 6 आठवड्यांत पूर्ण होईल) वगळता, सर्व भूमिगत स्थानकांमध्ये आणि आजूबाजूला रस्ते पुनर्स्थापित केले आहेत.

मल्टी-मॉडल इंटीग्रेशनचे महत्त्व लक्षात घेता विशेषत: स्थानकाजवळ येणाऱ्या/जाणाऱ्या प्रवाशांची सुरक्षित आणि सोय हे केंद्रबिंदू मानून एमएमएमआरसीने सर्वसमावेशक मल्टी-मॉडल इंटीग्रेशन नियोजनासाठी वाहतूक पोलिस, बेस्ट प्रशासन, मुंबई महापालिका आणि एमआयएएल (MIAL) यांच्याशी गेल्या काही महिन्यांपासून संवाद सुरू केला आहे व अंमलबजावणीसाठी आधीच विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत.

Mumbai Metro
Tendernama Impact : 'वैद्यकीय शिक्षण'चा सुल्तानी निर्णय रद्द! 5 पट पठाणी शुल्क वसुलीचा वादग्रस्त निर्णय मागे

मेट्रो स्थानकांमधून इतर वाहतूक सुविधेद्वारे प्रवेश व निकास सुलभतेसाठी पुढील कामे पूर्ण झाली आहेत...

मेट्रो लाईन 1 पासून एक्वा लाईनच्या मरोळ नाका स्थानकांच्या कॉन्कोर्सपर्यंत सर्वात नजीकच्या प्रवेश/ निकास स्थानास जिन्या द्वारे जोडणे, वातानुकूलित भूमिगत पादचारी क्रॉसिंग मुख्य रस्त्याच्या खाली स्टेशनसह जोडणे; एमआयडीसी सेंट्रल रोड, डब्ल्यूईएच आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स रोड, विमानतळ प्रवाशांसाठी सीएसएमआयए टी-१, आणि T-२ स्थानकांवर झाकलेली पादचारी छत, सांताक्रूझ मेट्रो स्टेशन सांताक्रूझ (WR) उपनगरीय स्थानकापासून 800 मीटर स्कायवॉकने जोडलेले आहे, मूलभूत माहिती चिन्हे, रस्ता खुणा आणि पादचारी क्रॉसिंग.

Mumbai Metro
Aditya Thackeray : मुंबईतील 1 हजार एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात कोणी घातली?

चालू असलेली कामे...
फूटपाथ जीर्णोद्धार आणि सुधारणा (अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे थोडा विलंब झाला), लिफ्ट आणि एस्केलेटरने सुसज्ज असलेल्या सर्व 10 मेट्रो स्थानकांचे प्रवेश/निर्गमन हळूहळू तयार होत आहेत.

मल्टी-मॉडल इंटिग्रेशनच्या कामांच्या पूर्ततेमुळे, प्रवाशांना येत्या काही आठवड्यांमध्ये सुखद प्रवासाचा अनुभव घेता येईल. मेट्रो स्थानके व इतर वाहतूक सुविधांदरम्यान सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाच्या सोई उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. यामुळे प्रवाशांना फायदा होईल.

- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com