Mumbai : मेट्रो-3च्या पहिल्या टप्प्यातील 10 स्टेशनची कामे पूर्ण

Mumbai Metro
Mumbai Metro Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईच्या पोटातून तब्बल 90 फूट जमिनीखालून जाणाऱ्या कुलाबा ते स्वीप्झ मेट्रो 3 या मुंबईतील पहिल्या भुयारी मार्गिकेवर लवकरच मेट्रो धावणार आहे. पहिल्या टप्प्यातील बीकेसी ते आरेदरम्यान 10 स्थानकांची कामे सध्या पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रतीक्षेत असलेला भुयारी मार्ग सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. एमएमआरसीने या मेट्रो मार्गिकेची तपासणी सुरु केली आहे. तसेच मेट्रोच्या दुसऱ्या टप्यातील कामांना देखील गती मिळाली आहे.

Mumbai Metro
Mumbai : कंत्राटदारांसाठी गुड न्यूज! न्यायालयाच्या दणक्यानंतर 'तो' निर्णय रद्द; 15 लाखांपर्यंतची कामे...

एमएमआरसीने 33.5 किलोमीटर लांबीचा हा भुयारी मार्गाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यावर एकूण 27 स्थानके आहेत. तसेच पहिल्या टप्प्यातील बीकेसी ते आरे दरम्यानची 10 स्थानके बांधून तयार झाली असून ही स्थानके 22 ते 28 मीटर जमिनीखालून जाणार आहेत. त्यापैकी मुंबई विमानतळाच्या जवळ असणारे सहार रोड, टर्मिनल 1 आणि 2 ही स्थानके सर्वात जास्त खोलवर असणार आहेत.

Mumbai Metro
Mumbai-Goa महामार्गावरील ‘या’ टप्प्याची साडेसाती कधी संपणार? 430 कोटींचे टेंडर मंजूर होऊनही रस्त्याची चाळणच

काही दिवसापूर्वी एमएमआरसीने आरडीएसओ पथकाकडून मेट्रो मार्गिकेची पाहणी करून घेतली आहे. तसेच पुढे कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीमार्फत देखील तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर सीएमआरएसचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. तर संपूर्ण मेट्रो मार्ग पुढील वर्षापर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com