Mumbai : Good News! मुंबईकरांचा वेळ वाचणार; सव्वा सहा किमीच्या 'त्या' बोगद्याचे...

Mumbai Coastal Road
Mumbai Coastal Road Tendernama

Mumbai News मुंबई : 'धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा'वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी आजपासून खुली करण्यात आली. (Mumbai Coastal Road News - CM Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar)

Mumbai Coastal Road
Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मिळणार सुखद धक्का; लवकरच...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या बोगद्याची पाहणी केली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.

उत्तर वाहिनी मार्गिका खुला केल्यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून सुमारे पाऊण तासांचे हे अंतर अवघ्या १० मिनिटात कापता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. भुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली चौक) पर्यंत जाणे सुलभ होणार आहे.

Mumbai Coastal Road
Electoral Bonds : वादग्रस्त स्मार्ट मीटर्सच्या टेंडरमध्येही 'चंदा दो, धंदा लो'! 2 कंपन्याकडून इलेक्टोरल बॉण्डद्वारे 85 कोटी

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या सागरी किनारा मार्गाचा पहिला ९ किलोमीटरचा टप्पा खुला केला होता. आजपासून सव्वा सहा किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला झाला आहे. सागरी किनारा मार्गाचा नरिमन पॉईंट येथून वरळीपर्यंत जाण्याऱ्या मार्गाची पाहणी केली. नरिमन पॉईंट ते हाजीअलीपर्यंतच्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला आहे. जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा तिसरा टप्पाही सुरू होईल.

Mumbai Coastal Road
Karhad : कचरा संकलनाचे क्यूआर कोड पडलेत धूळखात; पालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम कागदावरच

हा बोगदा अत्यंत अद्ययावत पद्धतीने बांधण्यात आला असून अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्वतः या फोनवरून नियंत्रण कक्षाशी आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो त्याची माहिती जाणून घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विंटेज कार मधून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांनी प्रवास करीत बोगद्याची पाहणी केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com