Mumbai-Goa Highway: 'तो' बोगदा 2 महिन्यात खुला होणार

Kashedi Tunnel
Kashedi TunnelTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) सर्वांत मोठा कशेडी बोगदा येत्या मे महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे. दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून दोन पैकी एक बोगदा वाहतुकीस सुरू होणार असल्याचे बांधकाम विभागातील उच्चपदस्थांनी सांगितले. या बोगद्यांमुळे कोकणवासियांचा प्रवास जलद होणार असून, मुंबई आणि कोकण, गोव्याचे अंतर आणखी कमी होणार आहे.

Kashedi Tunnel
Good News: रेडी रेकनर दर जैसे थे; बांधकामक्षेत्राला सरकारचा दिलासा

मुंबई - गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून या बोगद्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. नोव्हेंबर 2018 मध्ये या बोगद्याच्या कामाला सुरवात झाली. कशेडी बोगदा तीन पदरी असून, असे दोन बोगदे हाती घेण्यात आले आहेत. त्यातील मुंबईच्या बाजूने जाणाऱ्या एका बोगद्याचे काम 80 टक्के झाले आहे.

मे महिन्याअखेरीस म्हणजेच येत्या दोन महिन्यात या बोगद्यातून वाहतूक सुरू होणार असल्याचे बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कशेडी ते रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथील भोगाव इथपर्यंत कशेडी बोगदा असून एक तासाचे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यात कशेडी घाटातील रस्त्यांचाही समावेश आहे. भोगाव खुर्द आणि भोगाव बुद्रूक असा हा महामार्ग आहे. या दोन्ही गावांच्या बाजूने पाच किलोमीटर अंतरावर दोन बोगदे तयार होत आहेत.

Kashedi Tunnel
Nashik : 'PWD'त ठेकेदारांकडून होणाऱ्या टोल वसुलीचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई-गोवा महामार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या या दोन स्वतंत्र लेनच्या बोगद्याचे काम सुरू आहे. हे दोन्ही बोगदे तयार करण्यासाठी खास मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बोगद्यांसाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर कोकणवासियांचा प्रवास सुस्साट होणार आहे.

कशेळी घाटातील वळणे अत्यंत धोकादायक आहेत. या घाटांमध्ये वारंवार अपघात होत असतात. नवीन बोगदे तयार झाल्यानंतर कशेळी घाटातील अपघात होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच या दोन्ही बोगद्यांमुळे कोकणवासियांचा प्रवास जलद होणार असून मुंबई आणि कोकण, गोव्याचे अंतर आणखी कमी होणार आहे.

या दोन्ही बोगद्यांमध्ये सहा मार्गिका आहेत. म्हणजे बोगद्यातील सहा रस्त्यांवरून वाहतूक होणार आहे. यावरून या बोगद्याची व्याप्ती दिसून येते. याशिवाय बोगद्यात काही दुर्घटना घडल्यास आत 300 मीटरवर छेद मार्ग ठेवण्यात आला आहे. दोन्ही बोगद्यांची उंची 12 असून लांबी जवळपास 2 किलोमीटर आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com