Mumbai Goa Highway : मुख्यमंत्री शिंदे थेट उतरले रस्त्यावर; गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग...

Mumbai Goa Highway : मुख्यमंत्री शिंदे थेट उतरले रस्त्यावर; गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग...
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज स्वतः मैदानात उतरले आहेत. (Mumbai Goa Highway News)

Mumbai Goa Highway : मुख्यमंत्री शिंदे थेट उतरले रस्त्यावर; गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग...
‘एक राज्य एक गणवेश’ शाळा आणि शिक्षकांच्या चांगलाच अंगलट; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमुळे...

या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी समजून घेत त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

तसेच तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्विक सेटिंग हार्डनर (एम-60)चा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का, याचाही आढावा ते घेत आहेत.

Mumbai Goa Highway : मुख्यमंत्री शिंदे थेट उतरले रस्त्यावर; गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग...
Pune : खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पाला मंजुरी; यामुळे 'एवढ्या' पाण्याची बचत

याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळी त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली याचाही आढावा त्यांनी या दौऱ्यात घेतला.

मुंबई-गोवा महामार्गावरील गडब गावात नवीन पद्धतीनुसार खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. कोकणातील या महामार्गावर पडलेले खड्डे तीन वेगवेगळ्या पद्धतीने बुजवण्यात येतील असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Mumbai Goa Highway : मुख्यमंत्री शिंदे थेट उतरले रस्त्यावर; गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग...
Pune Traffic : पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर पोलिस आयुक्तांनी काय सांगितला उपाय?

जिओ पॉलिमर, जिओ कास्टिंग, रेपीड क्विक सेटिंग पॉलिमर आणि त्यांचे प्रि- कास्ट केलेले रस्त्यांचे पॅचेस वापरून हे खड्डे बुजवण्यात येतील. गणेशोत्सवापूर्वी जास्तीत जास्त खड्डे बूजवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. तसेच रस्त्यांच्या कामात ज्या अधिकाऱ्यांनी कसूर केली असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, तसेच पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, वाहतूक पोलिसांचे व एनएचएआयचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com