Mumbai BEST : धक्कादायक! बेस्टच्या सगळ्याच बस गाड्या निघणार भंगारात; कारण काय?

BEST Bus Mumbai
BEST Bus MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : बेस्ट (BEST) उपक्रमाच्या मालकीच्या बस ताफ्यात पूर्वीप्रमाणेच 3,337 स्वमालकीच्या बसगाड्या कायम ठेवण्यासाठी तातडीने निधीची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिले आहे, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली आहे.

BEST Bus Mumbai
Nashik : महापालिकेतील भरती प्रक्रियेचे एक पाऊल पुढे; टीसीएसने मागवली आरक्षणाची माहिती

सध्या, बेस्ट उपक्रमात स्वमालकीच्या 1,686 इतक्याच बसगाड्या शिल्लक राहिल्या आहेत. 2025 नंतर बेस्टच्या स्वमालकीच्या या सर्व बसगाड्या मुदत संपत असल्याने नियमानुसार भंगारात निघणार आहेत.

बेस्ट उपक्रम हा कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात सुरू आहे. बेस्टला तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी बेस्ट उपक्रमात कंत्राटी तत्वावर भाडे कराराने इलेक्ट्रिक, एसी खासगी बसगाड्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसगाड्यांचा ताफा कमीकमी होऊ लागला आहे.

याची दखल घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेऊन बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागातील स्वमालकीचा 3,337 बसगाड्यांचा ताफा कायम ठेवणे व त्यासाठी मुंबई महापालिकेकडून निधीची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी केली.

BEST Bus Mumbai
कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे बघा छत्रपती संभाजीनगरात काय घडले?

सध्या बेस्ट उपक्रमाकडे बस ताफ्यात स्वमालकीच्या फक्त 1 हजार 686 बसगाड्या आहेत. जून 2019 मध्ये मुंबई महापालिकेचे तत्कालीन प्रवीण परदेशी यांच्या दालनात झालेल्या कराराप्रमाणे बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या 3 हजार 337 बसगाड्यांचा ताफा कायम ठेवून त्यावरील बसगाड्या कंत्राटी असतील असे ठरले होते. मात्र सध्या बेस्ट उपक्रमात स्वमालकीच्या 1 हजार 686 इतक्याच बसगाड्या शिल्लक राहिल्या आहेत.

2025 नंतर बेस्टच्या स्वमालकीच्या बसगाड्या मुदत संपत असल्याने नियमानुसार भंगारात निघणार आहेत. परिणामी बेस्ट उपक्रमात स्वमालकीची एकही बस शिल्लक राहणार नाही.

ही गंभीर बाब लक्षात घेता युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून गंभीर विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे आणि स्वमालकीच्या बसगाड्यांचा ताफा पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्याबाबत राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन यांना तातडीने आदेश देण्याबाबत सूचना केलेली आहे.

BEST Bus Mumbai
Nashik : मायको सर्कल, त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपूल रद्दबाबत महापालिका काढणार श्वेतपत्रिका

त्या अनुषंगाने बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर, अनिल कोकीळ, अनिल पाटणकर, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, सरचिटणीस रंजन चौधरी, उपाध्यक्ष उमेश सारंग, मनोहर जुन्नरे, गणेश शिंदे यांनी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व त्यांना लेखी निवेदन देण्यात आले.

या चर्चेत आयुक्त यांनी बेस्टच्या मालकीचा ताफा 3 हजार 337 कायम ठेवण्यासाठी निधीची पूर्तता करण्यात येईल. त्याबाबत राज्य शासन आणि केंद्र सरकारला सुद्धा विनंती करण्यात येईल, असे सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com