MSRDC: मराठवाड्यासाठी गोड बातमी! 'या' 3 प्रकल्पांसाठी TOI प्रसिद्ध

Jalana - Nanded Samruddhi Mahamarg
Jalana - Nanded Samruddhi MahamargTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : जालना - नांदेड समृद्धी मार्ग (विस्तारीत मार्ग), (Jalana - Nanded Samruddhi Mahamarg (Extended) पुणे वर्तुळाकार रस्ता (Pune Ring Road) आणि विरार - अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मंगळवारी 'टेंडर ऑफ इंटरेस्ट' प्रसिद्ध केले आहे. एमएसआरडीसीने या तीन प्रकल्पांच्या कामासाठी एकूण २६ टप्प्यांमध्ये एकत्रित टेंडर ऑफ इंटरेस्ट जारी केले आहे. ठेकेदार कंपन्यांना येत्या ३० मेपर्यंत टेंडर (Tender) सादर करता येणार आहे.

Jalana - Nanded Samruddhi Mahamarg
Nashik : सिन्नर-शिर्डी 45 किमी प्रवासासाठी भरावा लागणार एवढा टोल

पुढील तीन महिन्यांत टेंडर ऑफ इंटरेस्ट प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर फायनल टेंडर मागविण्यात येतील. ही संपूर्ण टेंडर प्रक्रिया पूर्ण करून बांधकामाचे कार्यादेश जारी करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी अपेक्षित आहे. या तिन्ही प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला २०२४ मध्ये सुरुवात करण्याचे नियोजन आहे.

मुंबई – नागपूर अशा ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचा विस्तार जालना – नांदेडपर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी एमएसआरडीसीने १९० किलोमीटर लांबीचा जालना – नांदेड महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. आता या प्रकल्पाच्या कामासाठी टेंडर ऑफ इंटरेस्ट जारी करण्यात आले आहे. पाच टप्प्यात या महामार्गाचे काम करण्यासाठी टेंडर ऑफ इंटरेस्ट मागविण्यात आले आहे.

Jalana - Nanded Samruddhi Mahamarg
Nashik: TCS राबवणार महापालिकेतील 704 जागांची भरती प्रक्रिया

तसेच पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे रिंग रोड अर्थात पुणे वर्तुळाकार रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १३६ किमी लांबीच्या रस्त्याच्या बांधकामासाठी एमएसआरडीसीने टेंडर ऑफ इंटरेस्ट जारी केले आहे. एकूण नऊ टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. नऊ टप्प्यांसाठी स्वतंत्र टेंडर मागविण्यात आली आहेत.

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच विरार – अलिबाग अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) विरार – अलिबागदरम्यान १२८ किमी लांबीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका बांधण्याचा निर्णय घेतला होता.

एमएमआरडीएला हा प्रकल्प मार्गी लावता न आल्याने तो एमएसआरडीसीला हस्तांतरीत करण्यात आला. त्यानुसार आता १२८ किमीपैकी ९६.४१ किमी लांबीच्या मार्गिकेच्या बांधकामासाठी टेंडर ऑफ इंटरेस्ट जारी करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील ९६.४१ किमी लांबीच्या मार्गिकेचे बांधकाम ११ टप्प्यात करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Jalana - Nanded Samruddhi Mahamarg
बीड बायपासवरील देवळाई चौकातील उड्डाणपुलाखाली खोदकामाचे रहस्य काय?

या तिन्ही प्रकल्पांसाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतरच कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात येणार आहेत.
- अनिलकुमार गायकवाड, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com