Mumbai Metro-12 साठी लवकरच टेंडर; मुंबईशी 'या' भागांना जोडणार

Mumbai Metro
Mumbai MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या भागांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ च्या कामाला लवकर सुरुवात होणार असून त्याचे टेंडर येत्या दोन दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. मेट्रो १२ चे काम जलद गतीने सुरू असून टेंडरनंतर मेट्रोच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai Metro
Nashik : उत्पादन दुप्पट करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्राची 700 कोटींची गुंतवणूक

कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या वाहतूक प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महानगर आयुक्तांसह एमएमआरडीएचे अधिकारी, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पालिकांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Mumbai Metro
Mumbai : वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गासाठी 74 कोटींचा सल्लागार

विस्तारित ठाणे म्हणून ओळख असलेले कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा ही शहरे विविध राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली आहेत. मात्र या शहरांमधून बाहेर पडण्यासाठी शहरांतर्गत मोठा प्रवास करावा लागतो. हा प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटांत वाहन चालकाला महामार्गाला पोहोचता यावे, यासाठी ही सर्व शहरे आणि महत्त्वाचे रस्ते रिंग रोडने जोडण्यासाठीची संकल्पना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी  बैठकीत मांडली. त्यावर एमएमआरडीए प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच या नव्या मार्गाच्या आखणीसाठी नामांकित सल्लागारांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले. या सर्व शहरांमधून जाणारे मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास अवघ्या काही मिनिटांत वाहन चालक शहराबाहेर पडू शकेल. सध्या शहरातून महामार्गांवर पोहोचण्यासाठी वाहन चालकांना मोठा वेळ खर्ची घालवा लागतो.

Mumbai Metro
Mumbai Metro-3: 'टनेलिंग प्रोजेक्ट' आणि 'सेफ्टी इनिशिएटिव्ह' पुरस्काराने गौरव

सोबतच मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षात नवनवीन राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग उभारणी सुरू आहे. या सर्व मार्गांसाठी संलग्नता करणे आवश्यक आहे. ही संलग्नता करण्यासाठी संपूर्ण महानगर प्रदेशाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याची गरज आहे, असे सांगत यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घ्यावा. तसेच या कामी सर्व महापालिकांच्या प्रमुखांना बोलावून त्या संदर्भात बैठक घ्यावी, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैठकीत केले. त्यावरही एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी लवकरच ही बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. या संकल्पनेची अमलबजावणी झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com