मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) सरकता मार्गाद्वारे (ट्रॅव्हलेटर) मोनो रेल, मेट्रो आणि रेल्वे स्टेशन जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार मोनोरेल स्थानके चार रेल्वेस्थानकांसह एका मेट्रो स्थानकाशी जोडण्यात येणार आहे. या कामासाठी ६३ कोटी ६८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएने सल्लागारासह बांधकाम कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी टेंडर मागविली आहेत. जानेवारी २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्धिष्ट आहे.
पहिल्या टप्प्यात या सरकत्या मार्गाद्वारे महालक्ष्मी स्टेशन, संत गाडगे महाराज चौक, मोनोरेल टर्मिनल जोडले जाणार आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज मोनोरेल प्रकल्पातील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेशी जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक, मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील महालक्ष्मी स्टेशन तसेच महालक्ष्मी रेल्वेस्थानकाशी पादचारी पुलासह सरकत्या मार्गाने जोडण्यासाठी एमएमआरडीएने टेंडर मागविली आहेत. सल्लागारासह बांधकाम कंत्राटदाराची नियुक्ती या टेंडरद्वारे करण्यात येणार आहे.
संत गाडगे महाराज चौक ते मोनोरेल स्थानक आणि मेट्रो स्थानक यातील अंतर ७०० मीटर आहे हे अंतर चालणे त्रासदायक ठरणार असल्याने या सरकत्या मार्गावर उभे राहून प्रवास करणे सोपे होणार आहे. एमएमआरडीएने मोनो रेल, मेट्रो आणि रेल्वे जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार मोनोरेल स्थानके चार रेल्वेस्थानकांसह एका मेट्रो स्थानकाशी जोडण्यात येणार आहे. या कामासाठी ६३ कोटी ६८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ३२५ मीटर लांबीचा पादचारी पूल उभा करून त्यावर २६५ मीटर लांबीचा आणि ७ मीटर रुंदीचा सरकता मार्ग बांधण्यात येणार आहे. आठ मार्ग बांधण्याचे उद्धिष्ट आहे.