'एमएमआरडीए'कडून शहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणाचे टेंडर

MMRDA
MMRDATendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएने विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्गत शहाड येथील रेल्वे उड्डाणपूलाचे चौपदरीकरण करण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. या रेल्वे उड्डाणपुलाची एकूण लांबी 1090 मीटर इतकी आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन लवकरच या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

MMRDA
Mumbai : ब्लॅक लिस्टेड 'आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट'ला दीड हजार कोटींचे टेंडर; बीएमसीचा अनागोंदी कारभार

कल्याण - उल्हासनगरसह अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून अहिल्यानगर आणि परिसराला जोडणारा शहाड रेल्वे उड्डाणपूल महत्वाचा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहाड स्टेशन येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कल्याण बाजूच्या रस्त्याची रुंदी 30 मीटर असून उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील 36 मीटर आहे. या उड्डाणपुलावरची वाहतूक गेल्या काही वर्षात वाढली आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला चार पदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र उड्डाणपूल फक्त दुपदरी असल्याने अनेकदा उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारावर कोंडी होत असते. कधी वाहन उड्डाणपुलावर बंद पडल्यास अथवा उड्डाणपुलाची दुरूस्ती हाती घेतल्यास एकाच मार्गिकेवरून वाहतूक होते. परिणामी दोन्ही बाजूने कोंडी होत असते. त्यामुळे या उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करण्याची मागणी होती.

MMRDA
Mumbai : 'आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ मेट्रो सेवेत; 14 हजार कोटीत बनला 12.69 किमी मेट्रो मार्ग

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडे या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाची आग्रही मागणी केली होती. या कामासाठी निधीही मंजूर करून देण्यात आला होता. आता एमएमआरडीएने या कामासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. वाहनांची गर्दी आणि वाहतूककोंडीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शहाड स्टेशन येथील रेल्वेउड्डाणपूल चार पदरी विकसित करणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com