2 हजार कोटी खर्चाच्या 'मुंबई आय'साठी MMRDAचे टेंडर

Mumbai Eye
Mumbai EyeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून सुमारे २ हजार कोटी खर्चाच्या 'मुंबई आय' या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुढचे पाऊल टाकले आहे. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक नियुक्तीचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Mumbai Eye
Mumbai : बीएमसीतील घोटाळ्यांचा चेंडू आता राज्यपालांच्या कोर्टात

'मुंबई आय' प्रकल्पाचा तांत्रिक आणि व्यवहारपूर्वक अभ्यास, प्रकल्प विकासकाची निवड करण्यासाठी टेंडर प्रक्रियेचे व्यवस्थापन करणे आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवा पुरविण्यासाठी हे टेंडर आहे. एमएमआरडीएच्या १५४व्या बैठकीत 'मुंबई आय' या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने वांद्रे रेक्लेमेशनची जागा सूचविली आहे. खासगी- सार्वजनिक भागीदारीमध्ये हा प्रकल्प राबविण्याचेही प्रस्तावित आहे. एमएमआरडीएने ठरावात मांडलेल्या माहितीनुसार, जगभरातील विविध आकाश पाळणे, त्यांचा व्यास, उंची आणि बांधकाम खर्च इत्यादी बाबींची प्राथमिक माहितीच्या अनुषंगाने, १२०-१५० मी. व्यास असलेला आकाश पाळणा तसेच अनुषंगिक पायाभूत सुविधा, परिसराचा विकास याकरिता अंदाजे २००० कोटी इतका खर्च 'मुंबई आय' प्रकल्पाच्या उभारणीसाठी येईल. त्याचप्रमाणे, पर्यटकांना होणारी तिकिट विक्री, सभोवतालच्या परिसराचा वाणिज्यिक वापर यामधून प्रकल्पाव्दारे अपेक्षित उत्पन्नाचे स्त्रोत असतील.

Mumbai Eye
Mumbai : 'मेघा'ला बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याच्या टेंडरची लॉटरी

पर्याय म्हणून निवडण्यात आलेल्या जमिनींपैकी वांद्रे रेक्लेमेशन येथून वांद्रे - कुर्ला वित्तीय संकुलाची नजीकता, सागरी किनारपट्टीचे दर्शनिय दृश्य, शहराच्या आकाश रेषेचा विलक्षण अनुभव तसेच दादर येथील निर्माणाधीन असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'समानतेचे भव्य स्मारक' याची वांद्रे रेक्लेमेशन पासून असलेली नजीकता लक्षात घेत प्रस्तावित 'मुंबई आय' ते डॉ बाबासाहेब स्मारकापर्यंत फेरी सेवा उपलब्ध करुन दोन्ही पर्यटन स्थळे जोडली जाण्याची शक्यता या बाबींचा विचार करता वांद्रे रेक्लेमेशन हे स्थळ प्रकल्प उभारणीकरिता पर्यटन वाढीच्या दृष्टीने अधिक व्यवहार्य आहे, असेही एमएमआरडीएने सूचविले आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com