Mumbai: 'त्या' 6000 कोटीच्या भुयारी मार्ग टेंडरला 'ही' आहे डेडलाईन

Tunnel
TunnelTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह अंतर केवळ पाच मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) प्रस्तावित भुयारी मार्गाच्या टेंडरला १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. कंपन्यांना ६ हजार कोटींच्या या कामासाठी ८ मेपर्यंत टेंडर भरता येणार आहे. ३.५ किलोमीटर अंतराचा भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. येत्या जून-जुलैमध्ये कामास सुरुवात करुन २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Tunnel
Good News : राज्यात 'या' 40 ठिकाणी अतिरिक्त ई-चार्जिंग स्टेशन

पुणे, नवी मुंबई आणि ठाण्याहून दक्षिण मुंबईत येणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने २०१३ मध्ये १६.८ किमी लांबीचा पूर्वमुक्त मार्ग बांधला. या मार्गामुळे चेंबूर – सीएसएमटी अंतर केवळ २० ते २५ मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. मात्र ऑरेंज गेटजवळ आल्यानंतर नरिमन पॉईंटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. या वाहतूक कोंडीतून वाहनांची सुटका करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्वमुक्त मार्ग, ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्हदरम्यान भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

Tunnel
Mumbai: फडणवीसांच्या प्रयत्नांना यश! अखेर 'तो' आदेश मागे

पुणे, नवी मुंबई, ठाण्याहून मुंबईत येणाऱ्या वाहनांना थेट दक्षिण मुंबईत पोहोचणे सोपे व्हावे या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जपानमधील मे. पडॅको कंपनीने या साडेतीन किमी लांबीच्या प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर एमएमआरडीएने भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी फेब्रुवारी २०२३ मध्ये टेंडर प्रसिद्ध केले आहे. टेंडर सादर करण्याची अंतिम मुदत २४ एप्रिल होती. मात्र या मुदतीत एकही कंपनी पुढे आलेली नाही. त्यामुळे टेंडर प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक कंपन्यांना ८ मेपर्यंत टेंडर सादर करता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com