'त्या' आठ गावांतील रस्त्यांसाठी ३२६ कोटींचे टेंडर; सिमेंटचे रस्ते

MMRDA
MMRDATendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कल्याण ग्रामीणमधील उसरघर, घारीवली, निळजे, घेसर, कोळे, हेदूटणे, माणगाव आणि भोपर या आठ गावांना जोडणाऱ्या चार रस्त्यांच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ३२६ कोटींचे टेंडर जाहीर केले आहे. उसरघर-निळजे-घेसर या रस्त्याच्या कामासाठी १०७.१४ कोटी, निळजे-कोळे-हेदूटणे आणि उसरघर–घारीवली या दोन रस्त्यांसाठी १२३.४९ कोटींचे तर हेदूटणे-माणगाव-भोपऱ्या रस्त्यासाठी ९५.९९ कोटींचे टेंडर प्रसिद्ध झाले आहे. हे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत.

MMRDA
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयामुळे वाढले पुणेकरांचे टेन्शन?

कल्याण लोकसभा मतदारसंघात शहरी तसेच ग्रामीण भाग येतो. या दोन्ही भागातील नागरिकांना चांगले रस्ते उपलब्ध व्हावेत आणि त्यांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. या रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यांचा विविध यंत्रणांकडे पाठपुरावा सुरु होता. त्यात जिल्हा परिषद, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम या विभागांचा समावेश आहे. या सर्वच विभागांनी कोट्यावधींचा निधी कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विकसित केल्यास त्याचा गावांना फायदा होऊन गावाचा विकास होईल. या हेतून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्याचबरोबर कल्याण शहराच्या वेशीवर असलेल्या अनेक गावांमध्ये रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची आवश्यकता होती. त्यासाठी खासदार शिंदे यांनी एमएमआरडीएकडे निधीची मागणी केली होती. ही मागणी काही दिवसांपूर्वी एमएमआरडीएने मान्य करत रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. त्यापाठोपाठ आता या कामांसाठी एमएमआरडीएने नुकतेच टेंडर जाहीर केले आहे. यात उसरघर, घारीवली, निळजे, घेसर, कोळे, हेदूटणे, माणगाव आणि भोपर या आठ गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. एकूण ३२६ कोटी रुपयांची ही कामे आहेत. या निधीमुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत १ हजार कोटी रुपये रस्त्यांसाठी मिळवण्यात खासदार शिंदे यांना यश आले आहे.

MMRDA
गुड न्यूज! मुंबई-पुणे अंतर आणखी कमी होणार; या बोगद्याचे 80 टक्के..

कल्याण लोकसभा मतदारसंघात रस्त्यांसाठी आतापर्यंत १ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी ३६० कोटी, डोंबिवलीतील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांसाठी १०० कोटी, इतर रस्त्यांसाठी २०० कोटी रुपये आणि आता ग्रामीण रस्त्यांसाठी ३२६ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रस्ते कामासाठी टेंडर जाहीर केले आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण होताच तातडीने कामालाही सुरूवात केली जाईल, अशी माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com