ठाण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी 'त्या' पर्यायाची चाचपणी; सल्लागारासाठी टेंडर

Thane
ThaneTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची योजना मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन अर्थात एमएमआरसीएलने आखली आहे. शहरात २९ किलोमीटरपर्यंत ही मेट्रो धावणार आहे. याचा डीपीआर तयार करण्यासाठी लवकरच सल्लागार नियुक्ती करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पावर सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Thane
Tender : राज्य सरकारला दणका! 'तो' निर्णय आला अंगलट; 10 हजार कोटींच्या कामांना न्यायालयाने का दिली स्थगिती?

ठाणे शहरात रिंग मेट्रो प्रकल्प आणण्याची ही योजना आहे. या प्रकल्पामुळे ठाण्यात शहरातल्या शहरात नागरिकांना प्रवास करता येणार आहे. तसेच ठाणे मेट्रोसाठी देखील हा प्रकल्प फिडर रुट म्हणून उपयोगी पडणार आहे. २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात एकूण २२ स्थानकांची योजना असून डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, त्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी लवकरच टेंडर काढले जाणार आहे. या रिंग मेट्रोचा वापर ठाण्याच्या गर्दीच्या ठिकाणापासून ते घोडबंदर आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवे या दरम्यानचा दुवा म्हणून होणार आहे. तसेच मध्य रेल्वेचे ठाणे रेल्वेस्थानक ते ठाणे परिसरात जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या मेट्रोचा वापर होणार आहे. तसेच मेट्रो – 4 ( वडाळा ते कासारवडवली ) आणि मेट्रो- 5 ( ठाणे ते भिवंडी) या मेट्रोमार्गिकेसाठी फिडर रुट म्हणून रिंग मेट्रोचा उपयोग होणार आहे.

Thane
Mumbai : समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या 4 हजार कोटींच्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोळ; कोणी केला आरोप?

या मेट्रोचा वेग सरासरी दरताशी 35 किमी असणार आहे. तर सुरवातील दर पंधरा मिनिटांना एक ट्रेन सोडण्याची योजना असून प्रत्येक ट्रेनची 1500 प्रवाशांची क्षमता असणार आहे. संपूर्ण लूप ( वर्तुळ ) पूर्ण होण्यासाठी एक तासांचा अवधी लागणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 12000 कोटी रुपये असणार आहे. कासारवडवली येथे या मेट्रोचे कारशेड उभारण्याची योजना आहे. या मार्गावर एकूण 22 स्थानके असणार असून 20 स्थानके उन्नत स्वरुपाची तर 2 स्थानके अंडरग्राऊंड असणार आहेत. जुने ठाणे, नवीन ठाणे, रायलादेवी, वागळे इस्टेट सर्कल, लोकमान्य नगर बस स्टेशन, पोखरण-1, उपवन, गांधीनगर, काशीनाथ घाणेकर ऑडीटोरिएम, मानपाडा, पाटीलपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबिळ, हिरानंदानी इस्टे़ट, ब्रह्मांड, आझादनगर बस स्टॉप, मनोरमा नगर, कोलशेत,बाळकुम नाका, साकेत, शिवाजी चौक अशी स्थानके प्रस्तावित आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com