मुंबई (Mumbai) : मीरा-भाईंदर ते वसई-विरार या मेट्रो मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने या कामासाठी दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. हा मेट्रो मार्ग १३ क्रमांकाचा आहे. मीरा रोड ते विरार हा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आहे. ही मेट्रो सुरु होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी जाणार आहे.
सध्या दहिसर ते मीरा-भाईंदर या मेट्रो मार्गाचे काम प्रगतीपथावर असून हे काम आणखी सात-आठ महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याच मार्गाला वसई-विरार मेट्रो मार्ग जोडला जाईल. मुंबई परिसरात सुमारे तीनशेहून अधिक किलोमीटरचे मेट्रो रेल्वेचे जाळे विणले जात आहे. माजी खासदार राजेंद्र गावित खासदार यांनी मुंबई क्षेत्र प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे मीरा-भाईंदर ते वसई-मिरार विरार मेट्रो सुरू करण्याबाबत आग्रह धरला होता. वसई, विरार या परिसरातील होणारा विकास, वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारे शहरीकरण, औद्योगिकीकरण आदींचा विचार करून मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाने आता मीरा-भाईंदर ते वसई-विरार या मेट्रो मार्गाचे कामही हाती घेण्याचे ठरवले आहे. हा मेट्रोमार्ग तेरा क्रमांकाचा आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर या मेट्रो मार्गाचे काम प्रगतीपथावर असून हे काम आणखी सात-आठ महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्याच मार्गाला हा वसई-विरार मेट्रो मार्ग जोडला जाईल. त्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनची सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे एमएमआरडीएचे परिवहन अभियंता चंद्रकांत बनसोडे यांनी गावित यांना कळवले आहे.
मुंबई परिसरातील शंभर किलोमीटरच्या परिघातील शहरांचा विकास लक्षात घेऊन १३ मेट्रो लाईन टाकण्यात येणार आहेत. त्यात मीरा रोड ते विरार हा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग असून, त्यात वीस स्टेशनचा समावेश आहे. वसई, विरारची एकूण लोकसंख्या आणि मीरा-भाईंदर, वसईचे शहरीकरण लक्षात घेऊन हा मेट्रो मार्ग हाती घेण्यात येणार आहे. मीरा-भाईंदर मेट्रो साधारण पुढच्या वर्षी सुरू होण्याची अपेक्षा आहे, तर वसई, विरारपर्यंत ही मेट्रो येण्यासाठी आणखी किमान पाच वर्षे लागू शकतील.