मीठ बंदर ते कशेळी जलमार्गातील खडक फोडणार; लवकरच 424 कोटींचे टेंडर

Thane Creek
Thane CreekTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई आणि उपनगरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक कोंडी (Traffic Jam) व प्रदूषण (Pollution) टाळण्यासाठी ठाणे खाडी (Thane Creek), वसई खाडी (Vasai Creek) आणि उल्हास नदी (Ulhas River) जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई ते कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि वसईवरून जलमार्गाने प्रवास करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन पूर्ण झाले असून, या मार्गावर आठ जेट्टी उभारण्यासाठी लवकरच सुधारित टेंडर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

तसेच ठाणे खाडी ते वसई खाडी जोडण्यासाठी मीठ बंदर ते कशेळी या जलमार्गातील खडक फोडण्यासाठी आणि गाळ काढण्यासाठी सोईल ड्रेसिंग आणि रॉक ड्रेजिंग करण्यात येणार आहे. या कामासाठी सागरी महामंडळामार्फत लवकरच ४२४ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे.

Thane Creek
बीड बायपासवरील देवळाई चौकातील उड्डाणपुलाखाली खोदकामाचे रहस्य काय?

वाहतूक कोंडीमुळे सध्या मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील नागरिक त्रस्त आहेत. याशिवाय दिवसेंदिवस लोकल ट्रेनची प्रवासी संख्या सुद्धा वाढते आहे. त्यामुळे लोकल ट्रेन आणि रस्त्यावरचा ताण कमी करण्यासाठी समुद्र, खाडी आणि नद्या जोडून जलवाहतूक सुरू करण्याचा विचार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. राज्यात शिंदे सरकार येताच ठाणे खाडी, वसई खाडी आणि उल्हास नदी जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच ठाणे खाडी ते वसई खाडी जोडण्यासाठी मीठ बंदर ते कशेळी या जलमार्गात खडक फोडण्यासाठी आणि गाळ काढण्यासाठी सोईल ड्रेसिंग आणि रॉक ड्रेजिंग करण्यात येणार आहे. या कामासाठी सागरी महामंडळाला ४२४ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहेत.

अरबी समुदाच्या मुखापासून सुरू होणारी ठाण्याची खाडी एकीकडे नवी मुंबई, मुंब्रा, रेतीबंदर, कळवा असा २६ किलोमीटरचा प्रवास करून उल्हास नदीला मिळते. तर, दुसऱ्या टोकाला वसईहून घोडबंदरमार्गे कोलशेत, बाळकूम असा प्रवास करून ती अगदी ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत येते. विशेष म्हणजे ठाणे खाडी आणि वसई खाडी जोडण्यासाठी मीठ बंदर ते कशेळी दरम्यान खाडी मार्गात खडकाचा अडथळा आहे.

हा अडथळा दूर करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ४२४ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली. मीठ बंदर ते कशेळी दरम्यान हा खडक फोडून आणि खाडी खोल करण्यात येणार आहे. यासाठी सागरी महामंडळाकडून टेंडर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

Thane Creek
Nashik : ऑनलाईनच्या जमान्यात ठेकेदारांवर ऑफलाईन कृपा

केंद्र सरकारने 'सागरमाला' उपक्रमांतर्गत देशातील समुद्र, खाडी आणि नद्या जोडून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. तसेच केंद्र शासनाच्या द नॅशनल वॉटर वे ॲक्टनुसार महाराष्ट्रात १४ मार्ग हे राष्ट्रीय जलवाहतूक मार्ग (नॅशनल वॉटर वे) घोषित केले आहेत. यामध्ये ७ मार्ग खाड्यांच्या कक्षेत आहेत, तर ७ मार्ग नदींमध्ये आहेत. ठाणे खाडीतील जलमार्ग हा नॅशनल वॉटर वे NW-५३ असून त्याची लांबी १४५ किमी आहे.

या प्रकल्पात वसई - ठाणे – कल्याण (५० किमी) जलमार्ग क्रमांक ५३ या मार्गावर ८ जेटी उभारण्यात येणार आहेत. ज्यामध्ये डोंबिवली, कोलशेत, काल्हेर मिराभाईंदर, ठाणे मुलुंड, ऐरोली आणि वाशी जेट्टीचा समावेश आहे. या जेट्टी उभारण्यासाठी गेल्या वर्षी टेंडर काढण्यात आले होते. परंतु, खर्च जास्त असल्याने रिटेंडर तयार करण्यात आले आहे. हे टेंडर शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यास या जेट्टी उभारण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Thane Creek
Nashik : सॅमसोनाइट कंपनीची विस्ताराची घोषणा; 200 कोटींची गुंतवणूक

मिराभाईंदर ते कोलशेत ते काल्हेर ते डोंबिवली हे काम टेंडर प्रक्रियेत असून या कामाची किंमत १२० कोटी आहे. या जलमार्गाद्वारे डोंबिवली ते काल्हेर ते कोलशेत ते मिराभाईंदर मार्गे बोरिवलीपर्यंत जलवाहतूक प्रवास शक्य होणार आहे.

सागरमाला योजनेअंतर्गत बेलापूर ते वाशी ते मुलुंड ते ठाणे काम प्रस्तावित असून प्रशासकीय मान्यतेकरीता शासनास सादर केले आहे. तसेच या कामाची किंमत १२५ कोटी आहे. या मार्गाद्वारे गेट वे ऑफ इंडियापासून बेलापूर ते ठाणे खाडीतून जलवाहतूक करणे शक्य होणार आहे.

जलवाहतुकीमुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होईल. मध्य-पश्चिम रेल्वेला जल वाहतुकीने जोडल्याने डोंबिवली, बदलापूर, कल्याण, ठाणे आणि मुलूंड परिसरातील प्रवाशांना वसई, विरार, डहाणू परिसरात वेळेत पोहोचता येईल. यात वेळची मोठी बचत होणार आहे.

Thane Creek
MHADA: यंदा 12 हजार घरांसाठी 5,800 कोटींची तरतूद

राज्य सरकारने जलवाहतुकीला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यामुळे ठाणे खाडी व वसई खाडी जोडण्याचा जलमार्ग प्रकल्प आम्ही लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
- डॉ. अमित सैनी, कार्यकारी अधिकारी, सागरी महामंडळ

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com