मुंबईत ड्रीमहोम होणार शक्य; तब्बल ७५ हजार होमचा मेगा प्रोजेक्ट

MHADA
MHADATendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मायानगरी मुंबईत स्वतःचे ड्रीमहोम असावे असे इथे राहणाऱ्या प्रत्येकाला वाटत असते. सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे हे स्वप्न साकार करण्याची मोठी संधी चालून आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वसई पूर्व 360 एकर भूखंडावर सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प राबवला जाणार आहे. वसई पूर्व येथे खासगी - सार्वजनिक भागीदारी तत्वावर प्रकल्प आकाराला येणार आहे. या प्रकल्पात पंतप्रधान आवास योजनेची 75981 घरे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे अत्यल्प उत्पन्न आणि अल्प उत्पन्न गटातील घरे उपलब्ध होणार आहेत.

MHADA
काँग्रेसने फुकट वाटलेल्या कोळसा खाणीतून मोदी सरकारला मिळाले...

म्हाडाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प मंजूर करण्यासाठी म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॉन्सेपच्युअल ॲडव्हायजरी सर्व्हिसेस एलएलपी कंपनीच्या वसई येथील प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

MHADA
मुंबई: 20 वर्षे अडकलेला प्रकल्प 26 हजार कोटीत करण्यास ठेकेदार तयार

सुरक्षा स्मार्ट सिटीमार्फत सोडतीद्वारे याचे वितरण होईल. अत्यल्प उत्पन्न गटात ४५ हजार १७२ घरे असतील. त्यापैकी २७ हजार घरे म्हाडाच्या दरानुसार सोडतीसाठी असतील. अल्प उत्पन्न गटात ३० हजार ८२९ घरे असणार आहेत. यापैकी १७ हजार घरे म्हाडा दराप्रमाणे उपलब्ध होतील. घरांची किंमत २२ लाख ५० हजार रुपये असेल. अत्यल्प गटातील विजेत्यांना २.५ लाखांची सवलत मिळेल. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी पीएमएवायचे अनुदान मिळणार नाही. अत्यल्प उत्पन्न गटाला मुद्रांक शुल्काची रक्कम १ हजार आहे. अत्यल्प गटातील २ हजार ५०० घरांची सोडत ३१ मे रोजी काढली जाईल.

अत्यल्प उत्पन्न गट -
क्षेत्रफळ : 306 चौरस फूट
एकूण घरे : 27 हजार

अल्प उत्पन्न गट -
क्षेत्रफळ : 320 चौरस फूट
एकूण घरे : 17 हजार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com