MHADA: यंदा 12 हजार घरांसाठी 5,800 कोटींची तरतूद

MHADA
MHADATendernama
Published on

मुंबई (Mumbai) : चालू आर्थिक वर्षात म्हाडाच्या (MHADA) मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, अमरावती (Mumbai, Pune, Kokan, Nashik, Nagpur, Sambhajinagar, Amravati) या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण 12,724 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 5800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

MHADA
बीड बायपासवरील देवळाई चौकातील उड्डाणपुलाखाली खोदकामाचे रहस्य काय?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) २०२३-२०२४ च्या १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व २०२२-२०२३ च्या सुधारित ६९३३.८२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची नुकतीच मान्यता मिळाली आहे.

मुंबई मंडळांतर्गत येत्या आर्थिक वर्षात 2152 सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. मंडळातर्फे बीडीडी चाळींचा पुनर्विकास योजनेसाठी 2285 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अँटॉप हिल वडाळा येथील गृहनिर्माण योजनेसाठी 24 कोटी रुपये, बॉम्बे डाईंग मिल वडाळा योजनेसाठी 30 कोटी रुपये, कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजनेसाठी 100 कोटी रुपये, कन्नमवार नगर विक्रोळी येथील योजनेसाठी 213.23 कोटी रुपये, मागाठाणे बोरिवली येथील योजनेसाठी 50 कोटी रुपये, खडकपाडा दिंडोशी येथील गृहनिर्माण योजनेसाठी 18 कोटी रुपये, पहाडी गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

MHADA
Nashik : सॅमसोनाइट कंपनीची विस्ताराची घोषणा; 200 कोटींची गुंतवणूक

गोरेगांव सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये, धारावी पुनर्विकास प्रकल्प टप्पा 1 ब साठी 59 कोटी रुपये, गोरेगांव मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी 10 कोटी रुपये, पोलिस गृहनिर्माण प्रकल्प वसाहतीच्या पुनर्विकासासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोकण मंडळाअंतर्गत 5614 सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. मंडळांतर्गतच्या विरार बोळींज गृहनिर्माण प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 10 कोटी रुपये, बाळकूम ठाणे गृहनिर्माण प्रकल्पासाठी 33 कोटी रुपये, माजिवाडे ठाणे संयुक्त भागीदारी प्रकल्पासाठी 35 कोटी रुपये, मिरारोड टर्न की प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

MHADA
Sambhajinagar : 'या' कारणांमुळे रखडले प्रमुख जलकुंभाचे काम

पुणे मंडळाअंतर्गत ८६२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ५४०.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर मंडळाअंतर्गत १४१७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ४१७.५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

संभाजीनगर मंडळाअंतर्गत १४९७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात २१२.०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक मंडळाअंतर्गत ७४९ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ७७.३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अमरावती मंडळाअंतर्गत ४३३ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १४६.२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com