माहूल पंपिंग स्टेशनची रखडपट्टी; मुंबईची पुन्हा होणार 'तुंबई'

Mumbai
MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : किंग्ज सर्कल, शीव, गांधी मार्केट, नेहरूनगर, माटुंगा, सिंधी सोसायटी, चेंबूर, कुर्ला आणि रेल्वे मार्ग पूरमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) प्रस्तावित केलेले 'माहुल पंंपिंग' स्टेशन केंद्र सरकारच्या खोड्यामुळे लटकणार आहे. पंपिंग स्टेशन जागेच्या बदल्यात विकासकाला दिलेल्या जागेचा समावेश केंद्राने 'सीआरझेड'मध्ये केल्याने आता विकासकाला नवीन जागा देण्यासाठी पुन्हा संपूर्ण प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे माहुल पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे.

Mumbai
नवी मुंबई पालिका 'फुकटात' उभारणार 150 कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प

या भूखंड अदलाबदलीत 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयामागे ही राजकीय किनार तर नाही ना अशी शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईत अतिवृष्टी होण्याचे प्रकार वाढल्याने सखल भागांत पाणी भरते. त्यामुळे महापालिकेने ब्रिमस्ट्रोवॅड उपक्रमांतर्गत आतापर्यंत हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रो, क्लिव्हलँड, जुहू इर्ला आणि खार येथील गझदरबंद या ठिकाणी सहा पंपिंग स्टेशन उभारली आहेत. यामध्ये सेकंदाला हजारो लिटर पाणी समुद्रात फेकणे शक्य होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) खाते मागील अनेक वर्षांपासून माहुल पंपिंग स्टेशन बांधण्याकरिता केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनर खात्याकडे जागा मिळवण्याकरिता पाठपुरावा करीत होते. मात्र त्याला यश आले नाही. माहुल पंपिंग स्टेशन उभारणे ही तातडीची गरज असल्यामुळे महापालिकेने आता जागेच्या बदल्यात जागा मिळवून प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. या पंपिंग स्टेशनसाठी महापालिकेला आपली जागा देऊन प्रकल्पासाठी आवश्यक असणारी 15,500 चौरस मीटर जागा विकासकाकडून मिळाली आहे. मात्र आता या जागेचा समावेश केंद्र सरकारने 'सीआरझेड'मध्ये केल्याने पंपिंग स्टेशन रखडणार आहे.

Mumbai
मोदींच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन; तब्बल 21 किमीच्या बोगद्यासाठी...

माहुल पंपिंग स्टेशनची निकड लक्षात घेता, प्रमुख अभियंता (पर्जन्य जल वाहिन्या) यांनी मौजे आणिक न.भू.क्र. 1अ/11, 1अ/12 या दोन भूखंडांमधील 15,500 चौरस मीटर जागा महापालिकेच्या ताब्यात घेऊन महापालिकेच्या भूखंड न.भू.क्र. 1अ/14 मधील 15,500 जागा मे. अजमेरा रिऍलिटी ऍण्ड इफ्रस्ट्रक्चर इंडिया यांना प्रदान करण्याचे प्रस्तावित होते.

Mumbai
राज्यात दरवर्षी 12 हजार कोटींचा वीज घोटाळा!

माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी अजमेरा बिल्डर व महापालिका प्रशासनात जागा अदलाबदलीचा निर्णय झाला. परंतु महापालिकेने बिल्डरला दिलेली जागा केंद्राने सीआरझेडमध्ये टाकली आहे. त्यामुळे तेथे विकास करणे बिल्डरला शक्य नाही. माहुल पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी तब्बल 410 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र आता जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी माहुल पंपिंग स्टेशनसाठी महापालिकेच्या विकास नियोजन विभागाची पर्यायी जागेबाबत कार्यवाही सुरू आहे. डीपी डिपार्टमेंटने जागा सूचवल्यावर तातडीने पंपिंग स्टेशनचे काम सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले.

Mumbai
सोमय्यांचा 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा? संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

माहूल पंपिंग स्टेशनसाठी मुंबई महानगर पालिकेने खासगी विकसकाबरोबर भूखंडाची अदलाबदल करण्याच्या निर्णयावरुन भाजपने मोठा आरोप केला होता. या भूखंड अदलाबदलीत 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी भाजपने केली होती. खासगी विकसकाचे संबंधित भूखंडावर कोणतेही विकास काम होणार नव्हते. त्यामुळे हा भूखंड त्याच्यासाठी कवडीमोल होता. मात्र, महापालिकेने या भूखंडाच्या मोबदल्यात विकसकाला पर्यायी भूखंड देण्याचा निर्णय घेतला. महापालिका विकास कामांसाठी ताब्यात घतलेले भूखंड दुसऱ्यांना देऊ शकत नाही. मग, हा भूखंड महापालिका कसा देणार नाही, असेही प्रश्‍न भाजपने उपस्थित केले होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com