'GEM'मध्ये राज्याला 5 पुरस्कार; सरत्या वर्षात 4000 कोटींची खरेदी

GEM
GEM Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्राने शासकीय ई-बाजारात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण 5 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

GEM
याठिकाणी साकारणार ‘महा हब’; 500 कोटींची तत्वतः मान्यता:मुख्यमंत्री

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये शासकीय-ई-बाजारपेठ (Government e Marketplace (GeM)) ला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने शासकीय-ई-बाजारपेठ प्रणाली 2016 पासून  विकसित केली असून या अंतर्गत सरकारला आवश्यक सेवा सामुग्रीचा पुरवठा 'जेम'च्या माध्यमातून केला जातो. राज्य शासन, विविध विभाग, महिला उद्योजक, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील उद्योजकांना यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. यासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला 5 पुरस्काराने गौरविण्यात आले.

GEM
बिहारमध्ये कोसळलेल्या पुलाचे काम करणाऱ्या कंपनीलाच मुंबईत पुलाचे..

राज्याने 2022-23 मध्ये जेम प्रणालीवरून 4130 कोटींची खरेदी करून देशात तिसरे स्थान पटकावून रौप्य पुरस्काराचा मान मिळविला. स्टार्टअप - उद्योजकांच्या खरेदीमध्ये राज्याने दुसरे स्थान मिळविले असून सुवर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उद्योजकांच्या खरेदीमध्ये राज्याने चांगली कामगिरी केलेली असून या श्रेणीत राज्याचा दुसरा क्रमांक आलेला असून सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूक्ष्म व लघु उपक्रमांमार्फतच्या खरेदीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून रौप्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिला उद्योजकांमार्फतच्या खरेदी या श्रेणीमध्ये राज्य तिसरा क्रमांक मिळवून रौप्य पुरस्काराचा मानकरी ठरले. या सर्व श्रेणीतील पुरस्कार उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी स्वीकारले. उद्योग सह संचालक (खरेदी धोरण) विजू सिरसाठ यावेळी उपस्थित होत्या.

GEM
BMC : जम्बो कोविड सेंटर टेंडर प्रकरणी आयुक्तही अडचणीत?

राज्याच्या उद्योग संचालनालयाचे शासकीय ई-बाजार प्रणालीला प्रोत्साहन :
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये राज्याने राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी बाजारात व्यवसाय करण्यासाठी सातत्याने जेम पोर्टलवर अवलंबून राहून सार्वजनिक खरेदी प्रक्रियेची विश्वासार्हता वाढविण्याच्या दिशेने अनुकरणीय वचनबद्धता दर्शविली आहे. यांतर्गत उद्योग संचालनायाच्यावतीने राज्यात मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या विभागांकरिता कालबद्ध बाह्यपोच कार्यक्रम (Outreach Program) राबविला. याअंतर्गत जेम पोर्टलचा वापर वाढविण्यासाठी पोर्टलचे नवनवीन फिचर्स आणि कार्यप्रणालीबाबत जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले.

खरेदी प्रक्रियेत उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी जलद उपाय योजले. सूक्ष्म व लघु उद्योजकांची जेम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शासनाने विविध विभागांमार्फत जागरूकता कार्यक्रम आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित केली. आतापर्यंत शासनाने पोर्टलवर 7508 खरेदीदार प्रशिक्षणार्थीसाठी 105 प्रशिक्षण कार्यक्रम आणि 5004 पुरवठादारांसाठी 95 प्रशिक्षण कार्यक्रम आखले आहेत. राज्य शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे जेम पोटर्लवर आतापर्यंत एकूण नोंदणीकृत 1073377 पुरवठादार आहेत तर एकूण नोंदणीकृत 12398 खरेदीदार झाले आहेत. यासह पोर्टलवर राज्यातील एकूण नोंदणीकृत 10,619 सूक्ष्म व लघु पुरवठादार देखील आहेत. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com