'त्या' दोन तीर्थ क्षेत्रांना जोडणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वेचा मार्ग मोकळा; सरकारची 750 कोटीस मान्यता

Railway
RailwayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नांदेड-बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या हिश्याच्या ७५० कोटीस मान्यता देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते. त्यामुळे आता लवकरच या नवीन रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु होणार आहे.

Railway
Mumbai-Goa महामार्गासाठी शेवटची डेडलाईन; अन्यथा कठोर कारवाई

या नवीन ब्रॉडगेज मार्गासाठी जमिनीच्या किंमतीसह १५०० कोटी इतका खर्च येणार असून त्याच्या ५० टक्के म्हणजे ७५० कोटी इतका राज्य शासनाचा आर्थिक सहभाग असणार आहे. राज्याच्या ग्रामीण आणि अविकसित भागात रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी निवडक प्रकल्पात ४० ते ५० टक्के खर्च उचलण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे.  बिदर-नांदेड हा 157 कि.मी. नवीन रेल्वेमार्ग असून त्यापैकी 100.75 कि.मी. मार्ग महाराष्ट्रातील आहे आणि उर्वरित 56.30 कि.मी. मार्ग कर्नाटकमध्ये आहे. या सरळ रेल्वेमार्गामुळे बिदर ते नांदेड हे अंतर 145 कि.मी. ने कमी होईल. या मार्गावर एकूण 14 रेल्वे स्थानके असतील. 

Railway
Mumbai : 'एमटीएचएल'वर कारसाठी भरावा लागणार एवढा टोल; मंत्रीमंडळाचा निर्णय

गेल्यावर्षी रेल्वे अर्थसंकल्पाच्या पिंक बुकमध्ये बिदर-नांदेड या १५५ किलोमीटर अंतराच्या नवीन रेल्वे लाईनला मंजुरी देण्यात आली असून यासाठी सुमारे १ हजार २५२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या हिस्स्याचे ५० टक्के पैसे न भरल्यामुळे रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु झाले नव्हते. बिदर-नांदेड हा मार्ग नांदेड येथील हुजूर साहेब आणि नानक साहेब बिदर या तीर्थ क्षेत्रांना जोडणारा असून यामुळे देशभरातील शिख बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नांदेडला श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या समाधीचे दर्शन घेवून शीख भाविक बिदरलाही जातात.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com