ठाण्यात साकारणार नवे महापालिका भवन; 572 कोटींचे टेंडर

Thane Municipal Corporation
Thane Municipal CorporationTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाण्यातील रेमंड उद्योग समुहाच्या ४ एकर सुविधा भूखंडावर टीडीआरच्या मोबदल्यात ठाणे महापालिकेची सुसज्ज बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. याठिकाणी ३२ मजली नवे महापालिका भवन उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ठाणे महापालिकेने हे टेंडर प्रसिद्ध केले असून यासाठी सुमारे ५७२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Thane Municipal Corporation
शिंदे सरकारच्या 'त्या' निर्णयामुळे छोट्या कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी; न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

ठाणे महापालिकेचे मुख्यालय सध्या पाचपाखाडी भागात आहे. परंतु तेथील जागा कमी पडत असल्याने नवीन मुख्यालय उभारण्यात येणार आहे. ठाणे शहराची लोकसंख्या २० लाखाच्या पार पोहोचली असुन नगरसेवकांची संख्याही १३१ झाली आहे. तरीही ठाणे महापालिकेचा कारभार ३९ वर्षे जुन्या इमारतीतून सुरू आहे. महापालिका मुख्यालयाची इमारत जीर्ण झाली असून कामाचा व कागदपत्रांचा व्याप वाढल्याने नस्ती ठेवण्यासही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयाचा मेकओव्हर करण्याची अथवा नवीन मुख्यालय उभारण्याची मागणी होती.

Thane Municipal Corporation
Mumbai : ‘त्या’ 21 किलोमीटर लांब जलबोगद्याचा ऑक्टोबरमध्ये नारळ फुटणार; 5,500 कोटींचे बजेट

ठाणे महापालिका क्षेत्रातील रेमंड उद्योग समुहाच्या ४ एकराच्या सुविधा भूखंडावर टीडीआरच्या मोबदल्यात महापालिकेची सुसज्ज बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. नव्या ३२ मजली भव्य इमारतीमध्ये प्रशासकीय विभागासह पार्किंगची व्यवस्था, उद्यान, महापुरूषांचा इतिहास दर्शवणारे भव्य दालन असणार आहे. प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी ५७२ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून २५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

Thane Municipal Corporation
Mumbai : सिद्धीविनायक मंदिर सुशोभीकरणाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त; 500 कोटींचे बजेट

ठाणे महापालिकेची निर्मिती १९८२ साली झाली असली तरी महापालिकेचे मुख्यालय असलेली पाचपाखाडी येथील इमारत १ आक्टोबर १९८५ साली उभारण्यात आली. तळघर अधिक चार मजली असलेली ही इमारत जीर्ण बनली असल्याने नवीन मुख्यालय उभारण्याची आवश्यकता होती. ठाणे महापालिकेत एकूण ४० विभाग असून तळघरात स्थावर मालमत्ता, औषध भांडार, जकात, भांडारगृह, आयटी विभाग, संगणक कक्ष, विद्युत विभाग आणि भंगार कक्ष आहे. सरकारच्या नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत कर्मचारी - अधिकारी वाढले त्याचबरोबर फायली, नस्ती वाढल्या. पण जागाच अपुरी असल्याने हे सर्व बाड ठेवण्यास तसेच कर्मचारी-अधिकाऱ्यांना बसण्यास जागा अपुरी पडत आहे. तरीही, इमारतीच्या पुर्ननिर्माणाचा तसेच नवीन जागेत स्थलांतराचा प्रश्न अद्यापपर्यत प्रलंबितच राहिला होता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com