राज्यातील महापालिकांना प्रत्येकी 1 वाहनयुक्त रोबोटिक स्वच्छता यंत्र मिळणार; 502 कोटी मंजूर

cleaning machine
cleaning machineTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मॅनहोल, भूमिगत गटारे, जलवाहिन्या, 'सेप्टीक' टाकी, 'सिवेज' टाकी यांतील मैला उचलण्याचे काम करतांना सफाई कामगारांचा मृत्यू होतो. त्यामुळे यापुढे हे धोकादायक काम यंत्रमानवाद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यासाठी राज्यातील सर्व महापालिकांना प्रत्येकी १ वाहनयुक्त रोबोटिक स्वच्छता यंत्र देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत ५०२ कोटी ४० लाख रुपये इतका निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.

cleaning machine
स्थानिक रहिवाशांचा विरोध झुगारून धारावीत झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू

राज्यात 'मॅनहोलकडून मशीनहोलकडे' ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. हाताने मैला उचलण्यासाठी स्वच्छता कर्मचार्‍यांच्या नियुक्तीला प्रतिबंध करण्याचा केंद्र सरकारचा आदेश आहे तसेच सर्वाेच्च न्यायालयाची ही कुप्रथा बंद करण्याचा आदेश दिला आहे, यावर राज्य शासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. यापुढे भूमिगत गटारे, मल जलवाहिन्या, मलकुंड टाकी, सार्वजनिक शौचालये यांच्या स्वच्छतेसाठी यंत्रांचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिकांना प्रत्येकी १ वाहनयुक्त रोबोटिक स्वच्छता यंत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

cleaning machine
Mumbai : वरळीतील 'त्या' शासकीय महाविद्यालयात लवकरच बहुमजली वसतिगृह; 270 कोटींची मान्यता

मॅनहोलमध्ये उतरणाऱ्या सफाई कामगारांचा आतील विषारी वायुमुळे श्वास गुदमरून मृत्यू होत असल्याच्या घटना वारंवार घडत असतात. फक्त मुंबईतच मागील दोन वर्षांतच सहा कामगारांचे मृत्यू मॅनहोलमध्ये गुदमरून झाले आहेत. त्यामुळे मॅनहोल आणि भूमिगत गटारांची स्वच्छता करण्यासाठी माणसाचा वापर करणे अमानवी असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने अशा वापरावर बंदी घातली आहे.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com