झोपडीधारकांना मोठा दिलासा; पुनर्वसन सदनिका हस्तांतरण शुल्क आता 50 टक्केच

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या १ लाख रुपये इतके हस्तांतरण शुल्क आकारले जाते, आता ते ५० हजार रुपये घेतले जाईल.

Eknath Shinde
अजितदादांकडून झाडाझडती : ‘त्या’ एनओसीमुळे धरमतर खाडीपुलाचे 3000 कोटींचे रखडले टेंडर

झोपडपट्टी पुनर्वसन सदनिका या गरीब झोपडीधारकांना विनामूल्य दिलेल्या असतात. त्याचे हस्तांतरण करताना मुद्रांक शुल्कासमवेत १ लाख रुपये हस्तांतरण शुल्क आकारले जाते. यामुळे सदनिका विकत घेणाऱ्याला आर्थिक भुर्दंड होतो. मुंबईत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com