कोस्टल रोडमध्ये L&Tचा विक्रम! 'मावळा'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

Mavala TBM L&T
Mavala TBM L&TTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईच्या बहुचर्चित कोस्टल रोड (Costal Road) प्रकल्पात लार्सन अँड टुब्रोच्या (L&T) ‘मावळा’ या टनेल बोअरिंग मशीनने (TBM) एका महिन्यात ४५६.७२ मीटरचे खोदकाम करून जागतिक विक्रम केला आहे.

Mavala TBM L&T
चौपदरीकरणानंतरही पुणे-नाशिक प्रवासाला का लागताहेत ६ तास?

यापूर्वी टनेल बोअरिंग मशीनने केलेला ४५५.४ मीटर खोदकामाचा विक्रम मावळा टीबीएमने मोडला आहे. ही बाब जगभरातील बांधकाम उद्योगासाठी महत्त्वाची आणि खऱ्या अर्थाने इंजिनियरिंगचे यश दाखविणारी आहे, असे एल अँड टीचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष (सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर) एस. व्ही. देसाई म्हणाले.

Mavala TBM L&T
ठेकेदाराने काम बंद केले तर; भीतीने जलसंधारण विभागातील अधिकारीच...

कोरोना काळात हे टीबीएम मुंबईत आले होते आणि त्यावेळेस तज्ज्ञांना बाहेरचा प्रवास करणे शक्य नसल्यामुळे टीमने स्वतःच ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने टीबीएमची जुळणी केली. अंदाजे अडीच हजार टन वजनाचे हे टीबीएम त्यानंतर पूर्णपणे जुळवून लाँचिंग शाफ्टमध्ये बसवण्यात आले. एलअँडटी ने एक वेगळी पद्धत वापरली ती म्हणजे शाफ्टच्या आत टीबीएम फिरवून दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू केले. त्यामुळे मशिनचे भाग परत वगवेगळे करून ते उचलून दुसरीकडे वाहून नेण्याचा व परत जुळणी करून नव्या ठिकाणी ते बसवण्यास लागणारा काही महिन्यांचा वेळ वाचला.

Mavala TBM L&T
पुणेकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले; मुठा नदीतील पुलावरून... (VIDEO)

कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत दोन महाबोगदे खणण्यात येत आहेत. यासाठी ‘मावळा’ या अवाढव्य यंत्राचा नियमितपणे वापर करण्यात येत आहे. सागरी किनारा मार्गासाठी महाबोगदे खणण्याची सुरुवात ११ जानेवारी २०२१ रोजी झाली होती. पहिल्या बोगद्याचे खोदकाम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले होते. त्यापाठोपाठच १ एप्रिल २०२२ पासून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात आले. सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली आहे. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या स्वराज्य भूमीलगतच्या 'छोटा चौपाटी'पर्यंत असणार असून ते 'मलबार हिल'च्या खालून जाणार आहेत.

या दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे. हे बोगदे खणण्यासाठी १२.१९ मीटर व्यास असणारे भव्य असे 'टनेल बोरिंग मशीन' वापरण्यात येत असून, या यंत्राचे 'मावळा' असे नामकरण करण्यात आले आहे. हे यंत्र ४ मजली इमारती एवढे उंच असून, त्याची लांबी तब्बल ८० मीटर एवढी आहे.

Mavala TBM L&T
महाराष्ट्रातील नॅशनल हायवे का बनलेत मृत्यूचे सापळे?

दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७ किलोमीटर एवढी असणार आहे. तसेच खणण्यात येत असलेल्या दोन्ही बोगद्यांचा व्यास हा प्रत्येकी १२.१९ मीटर आहे. दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. सुरक्षेची व प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदे देखील महाबोगद्यांचा भाग असणार आहेत. दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम साधारणपणे या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com