Kalyan Ring Road : डोंबिवली ते टिटवाळा सुसाट; रिंग रोडच्या 4 टप्प्यांचे काम पूर्ण

Road
RoadTendernama
Published on

Kalyan Ring Road मुंबई : डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात गाठता यावे यासाठी उभारण्यात येत असलेल्या कल्याण रिंग रोडच्या (Kalyan Ring Road) आठ टप्प्यांपैकी टप्पा चार ते सात (दुर्गाडी ब्रीज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Road
GOOD NEWS : मराठवाड्यातील मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना मिळाला न्याय; हे आहे कारण

कल्याणमधील शहरी आणि ग्रामीण भागाच्या वाहतुकीला गती प्राप्त करून देणारा कल्याण रिंग रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर कल्याणमधील वाहतुकीला गती प्राप्त होणार आहे. या प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीए मुख्यालयात बैठक पार पडली.

या बैठकीत उर्वरित टप्प्यांचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनांसह प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन देखील जलदगतीने करण्यात यावे अशा सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.‌ यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थित होते.

Road
Mumbai News : मुंबईत दर्जेदार रस्त्यांसाठी महापालिकेचा चक्रव्यूह; काय आहे नवा प्लान? 

कल्याण रिंग रोड प्रकल्पाची आठ टप्प्यांमध्ये उभारणी करण्यात येत आहे. यातील टप्पा - ४ (दुर्गाडी ब्रीज ते गांधारे ब्रीज), टप्पा - ५ (गांधारी ब्रीज ते मांडा जंक्शन), टप्पा - ६ (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन), टप्पा - ७ (टिटवाळा जंक्शन ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) या टप्प्यांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. तर रस्ता नागरिकांच्या सेवेत आला आहे. टप्पा - ३ (मोठा गाव ब्रीज ते गोविंदवाडी रोड) या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे. टप्पा - १ (हेदुटणे ते शिळ रोड) आणि टप्पा - २ (शीळ रोड ते मोठागाव ब्रीज) या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करून हे देखील काम २०२६ पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे.

प्रकल्पामुळे काटई टिटवाळा हे एक तासाचे अंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. अवजड वाहनांची वाहतूक देखील या मार्गावरून होणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर भार येणार नाही. यामुळे शहरांतर्गत वाहतुकीला गती मिळेल. तसेच या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील वाहतूक सेवा अधिक गतिमान होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com