कर्नाटकात उभारणार 22,900 कोटींचा प्रकल्प; 1500 रोजगारांची निर्मिती

Karnataka
KarnatakaTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) 22,900 कोटी ($3 अब्ज) गुंतवणुकीचा राज्यात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्रकल्प उभारण्यासाठी इस्रायलस्थित आयएसएमसी ऍनालॉग फॅब प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांच्या उपस्थितीत राज्य सरकारचे आणि कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्यात या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 1,500 रोजगार क्षमता असलेला हा प्रकल्प पुढील 7 वर्षांत पूर्ण करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. कर्नाटक सरकारच्यावतीने आयटी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. ईव्ही रमण रेड्डी आणि आयएसएमसीचे संचालक अजय जालान यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

Karnataka
५ हजार कोटींचे 'ते' टेंडर टाटा मोटर्सकडे; २५ हजार रोजगाराच्या संधी

आयटी, बीटी आणि आर अँड डी क्षेत्रात कर्नाटक राज्य अग्रेसर आहे. आयएसएमसी सोबतचा सामंजस्य करार कर्नाटकला सेमीकंडक्टर तंत्रज्ञानामध्ये आणखी अग्रेसर बनवेल, असे बोम्मई यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर सांगितले. देशातील इतर अनेक राज्ये सेमीकंडक्टर फॅब क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी स्पर्धा करीत आहेत, अशा काळात कर्नाटकने या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

Karnataka
'समृद्धी'च्या टोल वसुलीची लॉटरी 'या' कंपनीला?

बोम्मई म्हणाले की, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी फक्त सवलती किंवा प्रोत्साहन देऊन भागणार नाही तर त्यासोबत राज्यात अनुकूल वातावरणाची सुद्धा आवश्यकता आहे. राज्यात उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रातील ही एक मोठी भरारी आहे. पुढे आव्हाने आहेत. पण या सामंजस्य करारामुळे आम्हाला त्या आव्हानांचे संधीत रूपांतर करणे शक्य होईल, असेही बोम्मई म्हणाले आहेत. बोम्मई यांनी आयसीएमसीला राज्यात प्लांट उभारण्यासोबतच भविष्यात नवनवे तंत्रज्ञान विकसित करण्याची विनंती केली आहे. यावेळी उच्च शिक्षण मंत्री सीएन अश्वथनारायण आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com