IIT Mumbaiचा दर्जेदार, गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी महापालिकेला लाखमोलाचा सल्ला

Mumbai
BMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प दर्जेदार आणि अत्युच्च गुणवत्तापूर्ण होण्यासाठी महापालिका अभियंत्यांनी दक्ष असणे आवश्यक आहे. कॉंक्रिट रस्त्याचा आराखडा, तंत्रज्ञान, गुणवत्ता चाचण्या, हवामान यांसह कॉंक्रिट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना या विषयी महापालिका अभियंत्यांनी अद्ययावत राहिले पाहिजे. गुणवत्ता नियंत्रणासाठी अधिक सक्षमपणे नियोजन केले पाहिजे, असा सूर महापालिका अभियंता व रस्तेविषयक तज्ज्ञांच्या कार्यशाळेत उमटला.

Mumbai
Mumbai : महापालिकेचा डंका; 100 किलोमीटर जलबोगदे असणारे जगात दुसरे शहर

महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण कामांची अत्युच्च दर्जोन्नती, कामांमध्ये येणारी आव्हाने, तसेच शंकांचे निरसन या सर्व बाबींच्या अनुषंगाने महापालिका अभियंत्यांसोबत विचारमंथन करण्यासाठी पवईस्थित भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) येथे एकदिवसीय विचारमंथन कार्यशाळा पार पडली. मुंबईत सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे करताना निर्माण होणारी आव्हाने, याबाबत महापालिकेच्या अभियंत्यांनी कार्यशाळेदरम्यान विचार मांडले. सिमेंट कॉंक्रिट आणि खडी वाहून आणणारी वाहने तसेच रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट यामधील अंतर, मुंबईतील वाहतूक कोंडी, हवामान यासारखी विविध आव्हाने असल्याचे अभियंत्यांनी नमूद केले. त्यासोबत वाहतूक कोंडीमुळे सिमेंट खडी मिश्रणात पाण्याचे घटणारे प्रमाण यासाठी मुंबईतील वातावरण, वाहतूक कोंडी यासारखे घटक कारणीभूत ठरत असल्याचे सांगण्यात आले. रस्त्याची कामे करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मिळणारी परवानगी तसेच मुंबई महानगरात असणारे 'मॅनहोल्स'चे जाळे हे देखील आव्हाने असल्याचा अभिप्राय अभियंत्यांनी नोंदविला.

Mumbai
Mumbai News : अखेर 'तो' 131 वर्षे जुना उड्डाणपूल बंद; असा बांधणार नवा पूल

आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव यांनी सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या आराखड्याच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाबाबतची माहिती आणि निकष यांची मांडणी केली. तसेच मुंबईतील तापमान आणि वाहनांची वर्दळ या अनुषंगाने विचार करून सुयोग्य तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. मुंबईतील मृदा परीक्षणाची अद्यावत आकडेवारी वापरणे शक्य आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी प्रसरण सांध्यातील आदर्श पद्धती आणि मृदा परीक्षणाची आकडेवारी लक्षात घ्यावी. चांगल्या प्रसरण सांध्यामुळे रस्त्याच्या आयुष्यमानात वाढ होवू शकते, यासह इतर आवश्यक बाबींचाही त्यांनी उहापोह केला. तसेच प्रसरण सांध्यांमधील भेगा, सांध्यातील जास्त अंतर, हलकी आणि जड वाहतूक लक्षात घेता कोणत्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करावी, या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी विविध स्वरूपाच्या चाचण्यांचा समावेश करण्यावरही त्यांनी भर दिला. सिमेंट काँक्रिट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना, या विषयावर आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. सोलोमॉन देबर्ना यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यावर कोणत्या पद्धतीच्या भेगा आहेत, ते पाहून कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या. सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांवरील भेगांसाठी सध्या उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानांचीही त्यांनी माहिती दिली. तर, प्रा. डॉ. के. व्ही. राव यांनी महानगरपालिकेने आगामी काळात रस्त्यावरील भेगा दुरूस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर कॉंक्रिटसारख्या पर्यांयांचा वापर करून विशेष पथके नेमण्याची गरज विषद केली.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महापालिका आयु्क्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव, प्रा. पी. वेदगिरी, प्रा. दीपांकर चौधरी, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते आणि वाहतूक) मनिषकुमार पटेल तसेच संबंधित अधिकारी व रस्ते कामांमध्ये नियुक्त अभियंते यावेळी उपस्थित होते. एकूण १५५ हून अधिक महापालिका अभियंते तसेच सल्लागार कंपन्यांच्या अभियंत्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com